अड्याळ परिसरात विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 00:27 IST2016-04-17T00:27:06+5:302016-04-17T00:27:06+5:30

पवनी तालुक्यातील अड्याळ व ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रात ३.१७ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

Building and publications of development works in Adyal area | अड्याळ परिसरात विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अड्याळ परिसरात विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

जि.प. क्षेत्रातील कामे : ३.१७ कोटी रुपयांची कामे राजेश डोंगरे यांनी खेचून आणली
पवनी/अड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ व ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रात ३.१७ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी अल्पावधीतच कोट्यावधीची कामे खेचून आणले. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांचा विकास हे ध्येय मनाशी बाळगून आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात विकासात्मक कामांच्या झंझावातातून वाटचाल करीत ब्रम्ही जिल्हा परिषद क्षेत्रात २५ तर अड्याळ जिल्हा परिषद क्षेत्रात १५ कामे मंजूर करून भक्तनिवास, पाईपलाईन, सभामंडप, रस्ते व नाली बांधकाम, मोरी बांधकाम अशा विविध कामांचा समावेश आहे. १५ एप्रिलला दुपारी नेरला डोंगर महादेव भक्त निवासाचे भूमिपूजन, चिचाळ येथे विकासकामांचे भूमिपूजन, शेंद्री (बुज) येथे बुद्धविहाराचे लोकार्पण, ब्रम्ही येथे विकासकामांचे भूमिपूजन, निघवी येथे विकासकामांचे भूमिपूजन, भेंडारा येथे विकासकामांचे भूमिपूजन व सभामंडपाचे लोकार्पण तर सायंकाळी रुयाळ येथे ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री विलासराव श्रृंगारपवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, दूध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, सभापती नरेश डहारे, सभापती शुभांगी रहांगडाले, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, नेरलाचे सरपंच अनिल कोदाने, चिचाळचे सरपंच उषा काटेखाये, ब्रम्हीच्या सरपंच रिता धावडे, निघवीच्या सरपंच मनिषा फुंडे, भेंडाळाचे सरपंच भारती राणे, रुयाळचे सरपंच कविता मोटघरे, उपसरपंच श्रीकांत भोगे, पं.स. सदस्या मंगला रामटेके, डॉ.विजय ठक्कर, शैलेश मयूर, नंदू कुर्झेकर, मनोरता जांभुळे, सुनंदा मुंडले कुंडलीक काटेखाये, शरद काटेखाये, अनिल धकाते, सुधा इखार वनिता वैरागडे, चेतक डोंगरे, तोमेश्वर पंचभाई, जि.प. सदस्य पारबता डोंगरे यांच्यासह पवनी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)

Web Title: Building and publications of development works in Adyal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.