स्वप्नातील रेल्वे स्टेशन निर्माण करणार
By Admin | Updated: June 5, 2015 00:53 IST2015-06-05T00:53:14+5:302015-06-05T00:53:14+5:30
भंडारा रोड रेल्वे स्थान जिल्ह्याचे प्रवेश द्वार आहे. या स्थानकावर समस्या दिसणर नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

स्वप्नातील रेल्वे स्टेशन निर्माण करणार
नाना पटोले यांचे प्रतिपादन : भंडारा रोड रेल्वे आर.पी.एफ. चौकीचे उद्घाटन
वरठी : भंडारा रोड रेल्वे स्थान जिल्ह्याचे प्रवेश द्वार आहे. या स्थानकावर समस्या दिसणर नाही यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशाच्या सुरक्षेच्या तक्रारी होत्या. त्यासंदर्भात भंडारा रोड रेल्वे स्थानकावर आर.पी.एफ. जवानाची स्थायी चौकी सुरू करण्यात आली. लवकरच जी.आर.पी. जवानाची चौकशीसह या रेल्वे स्टेशनवर असलेल्या सर्व समस्या मार्गी लावून स्वप्नातले भंडारा रोड रेल्वे स्टेशन निर्माण होईल, असे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले.
भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर आर.पी.एफ. पोलीस चौकीचे लोकार्पण व विविध विकास कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेल्वेचे नागपूर विभागाचे डी.आर.एम. आलोक कन्सल, नागपुर मंडळ सुरक्षा आयुक्त डी.बी. गौर, वरिष्ठ मंडळ अभियंता अखिलेश शाहु, विद्युत मंडळ अभियंता आर.के. पटेल, आऊट पोस्ट इनचार्ज वी.बी. भालेकर उपस्थित होते.
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ११ आर.पी.एफ. जवानाची चौकी मंजूर करण्यात आली आहे. सध्या या चौकीचा प्रभार ए.आय.वी.बी. भालेकर असून त्यांच्यासह चार कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आर.पी.एफ. प्रभारी माणिकचन्द्र यांनी दिली. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशाची लुटमार व धावत्या गाडीत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळ्यावर लक्ष ठेवून सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात असलेली भिती दूर होणार असल्याने प्रवाशात आनंद दिसत होता.
उद्घाटन कार्यक्रमनंतर खा. नाना पटोले यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व गावकऱ्याची बैठक घेतली. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सेवक कारेमोरे, मिलिंद रामटेके, मिलिंद धारगावे, घनश्याम बोंदरे यांनी विविध समस्या मांडल्या. त्या त्वरीत सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. संचालन व आभार स्टेशन मास्टर कल्याण रामटेके यांनी मानले. (वार्ताहर)