बुध्दाचा धम्म हा आचरणाचा धम्म
By Admin | Updated: October 17, 2015 00:59 IST2015-10-17T00:59:14+5:302015-10-17T00:59:14+5:30
जातीच्या धर्माच्या नावाने विषमता असुनही या देशातून संपली नाही. परिणामी देशातील प्रश्न अजुनही तसेच आहे.

बुध्दाचा धम्म हा आचरणाचा धम्म
भीमगिरी येथे बुध्द मेळावा : राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : जातीच्या धर्माच्या नावाने विषमता असुनही या देशातून संपली नाही. परिणामी देशातील प्रश्न अजुनही तसेच आहे. मुंगीला साखर, माणसाला अस्पृशतेचा डाग असी अवस्था आहे. बुध्दाचा धम्मातील पंचशील तत्वाचे आयुष्यात आपल्या आचरणात आणल तर जिवनाच मंगलमय होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
भिमगिरी बुध्दीस्ट वेल्फेअर सोसायटी अंतर्गत बौध्द पर्यटनस्थळ राजेदहेगाव येथील सार्वजनिक बुध्द विहार येथे भिम बुध्द धम्म मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भदन्त अन्त्दर्शी स्थवीर हे होते. यावेळी थायलँडचे अफीनीता, मोनयाफत, डॉ. पोंगपत, सारावूत, आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधक बाबु आंबेडकर, एम. एस. मस्के, व्यवस्थापक रविंद्रन, राजेश टेंभुर्णे, जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, बोधानंद गुरुजी, भदन्त सघाप्रिय, संघमित्रा मस्के उपस्थित होते.
यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले, प्रत्येकानी दानाची महत्ती काय ती ओळखली पाहिजे, देशामध्ये जनावरांची पुजा केली जाते. दगडाच्या माणसांचा तिरस्कार का केला जातो. डॉ. बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्यांच प्रेरणेने जीवनात उतरवून न्याय हक्कासाठी लढा तेवत ठेवावे.
अध्यक्षीय भाषणात भदंत अत्तदर्शी स्थवीर यांनी बौध्द भीक्षु कसा असावा, या भिक्षुचा आदर कशासाठी करावा, उपासक-उपासीकेची भुमीका काय याविषयी मार्गदर्शन केले. सकाळी धम्मध्वजारोहन धम्मसेन यांच्या करण्यात आले. सकाळी सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली.
याप्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आले. सांस्कृतिक व भजन स्पर्धा घेण्यात आले. शहापूर प्राथमिक केंद्राचे यु.बी. देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भीम बुध्द मेळाव्याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे भाषणे झाली. धम्म प्रबोधनपर सिध्दार्थ कुमार सरदार व संचद्वारे गिताचा कार्यक्रम झाला.
प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन गणेश वानखेडे यांनी केले. आभार प्रदर्शन अनमोल मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमासाठी आसाराम सेलारे, भिमराव बंसोड, लोकेश चव्हाण, भिमराव लाडे, संकट गजभिये, सुग्रता कंडबे, शांता गजभिये, पुष्पा डोंगरे, गिता रामटेके, शालीनी भैसारे, सारीका डोंगरे, विमला मेश्राम, द्वारका मेश्राम, कमल सेलोर, माधुरी हुमणे, विमल राऊत, प्रकाश मेश्राम, भिमराव डोंगरे, विनोद बागडे, रविंद्र मेश्राम महेंद्र कडंबे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)