बंदुकीला मिळाली गार्डरुम
By Admin | Updated: September 30, 2014 23:33 IST2014-09-30T23:33:10+5:302014-09-30T23:33:10+5:30
बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाईनंतर शासकीय आयटीआयमध्ये गार्डरुम उपलब्ध करून देण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात मंजूर पदे ९५ असून ४० पोलिसांवर

बंदुकीला मिळाली गार्डरुम
तुमसर : बंदूक हाताळताना हलगर्जीपणा करणाऱ्या तुमसर येथील चार पोलिसांवर कारवाईनंतर शासकीय आयटीआयमध्ये गार्डरुम उपलब्ध करून देण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात मंजूर पदे ९५ असून ४० पोलिसांवर ३२ गावे व शहराची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे .कारवाई झालेले पोलीस पुन्हा तुमसरात परत येत असल्याची माहिती आहे.
तुमसर पोलीस ठाण्यातील प्रकाश बोकडे, रमेश बेदुरकर, शरद गिऱ्हेपुंजे व सुधीर कळमकर या पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कैलाश कणसे यांनी बंदूक हाताळताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून कारवाई केली होती.
या पोलिसांना कारणे दाखवा नोटीस व एक हजाराचा दंड ठोठावला होता. चार पोलिसांना जिल्हा पोलीस मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. या कारवाईनंतर पोलिसांना गार्ड रुम उपलब्ध करून देण्यात आले.
तुमसर शहर व ३२ गावांकरिता पोलिसांची मंजूर पदे ९५ आहेत. त्यापैकी सध्या केवळ ५५ पोलीस येथे कार्यरत आहेत.
विधानसभा निवडणूक दुर्गोत्सवानंतर पुढे दिवाळी सण आहे. येथे पोलिसांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तुमसर पोलीस ठाण्यातून १५ दिवसापूर्वी पोलिसांच्या विनंतीवरून ११ पोलिसांचे स्थानांतरण झाले होते. परंतु नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालकांनी मंजूरी दिली नाही. त्यामुळे त्यांचे स्थानांतरण टळले अशी माहिती आहे.
सध्या जिल्हा मुख्यालयात भंडारा जिल्ह्यातील विविध ठाण्यातील २६ ते २७ पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात रूजू होण्याचे आदेश दिल्याने ते भंडारा येथे कर्तव्यावर असल्याची माहिती आहे. तुमसर शहर व तालुका संवेदनशील आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)