शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ‘बीटीबी’ महापुराच्या गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 05:00 AM2020-09-14T05:00:00+5:302020-09-14T05:00:29+5:30

येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली.

BTB enriches farmers in floods | शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ‘बीटीबी’ महापुराच्या गाळात

शेतकऱ्यांना समृद्ध करणारी ‘बीटीबी’ महापुराच्या गाळात

googlenewsNext
ठळक मुद्देप्रशासनाकडून दुर्लक्ष :शेतकरी, व्यापारी, ग्राहकही संकटात, नुकसानीची पाहणी करण्यास कुणाला सवड नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांना समृध्द करणारी येथील बीटीबी सब्जीमंडी वैनगंगेच्या महापुराने गाळात रुतली. एका रात्री होत्याचे नव्हते झाले. बीटीबीला बेटाचे रुप आले होते. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकही संकटात आले. मात्र पुर ओसरुन आता पंधरा दिवस झाले तरी शासन आणि प्रशासनाच्यावतीने साधी विचारपूसही करण्यात आली नाही.
येथील जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत बंडू बारापात्रे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने बीटीबी सब्जीमंडी उभारली. शेतकऱ्यांचा मालाला योग्य दाम देवून शेतकऱ्यांना वैभव मिळून देण्याचा प्रयत्न सुरु केला. जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात या सब्जीमंडीची ख्याती पसरली आहे. परंतु २९ ऑगस्टच्या रात्री वैनगंगेच्या महापुराचे पाणी बीटीबी सब्जीमंडीत शिरले. पाहतापाहता संपूर्ण सब्जीमंडी पुराच्या विळख्यात सापडली. तेथील भाजीपाला, कॅरेटस् पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर तेथे असलेले वाहनही तीन दिवस ३० फुट पाण्यात होती. बीटीबी सब्जीमंडीच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झाले. प्रत्येकजण याबाबत हळहळ व्यक्त करीत होते. आता पूर ओसरल्यानंतर बीटीबी सब्जीमंडी ओस पडल्याचे दृष्य आहे. शासनाकडून मदत मिळण्याची आशा आहे. परंतु ना अधिकाऱ्यांनी ना लोकप्रतिनिधींनी सब्जीमंडीला भेट दिली. साधी चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रशासनाने महापुराची वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान बीटीबीचे झाले नसते, एवढे बोलले जात आहे. बीटीबीने विविध सामाजिक उपक्रमात शासन आणि प्रशासनाला मदत केली. परंतु बीटीबी संकटात असताना कुणीही अद्यापपर्यंत मदतीला धावून आले नाही. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेने तीन दिवसाचा जनता कफर्यू लागू केला. यात जीवनावश्यक वस्तूंना सुट देण्यात आली. मात्र शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांचा विचार करण्यात आला नाही. बीटीबी थेट तीन दिवस बंद करण्याचा आदेश मिळाला त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आधीच महापुराने उद्ध्वस्त झालेली बीटीबी सावरण्याचा प्रयत्न करीत असताना प्रशासन मात्र कोणतीही सहकार्य करतांना दिसत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यातून समृध्दीची वाट दाखविणाºया बीटीबीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी करीत आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेळीच सूचना दिली असती तर एवढे मोठे नुकसान निश्चितच टाळता आले असते. पंरतु कोणतीच पूर्वसूचना मिळाली नाही. त्यामुळे बेसावध क्षणी बीटीबी सब्जीमंडी उद्ध्वस्त झाली. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मदत करावी.
- बंडू बारापात्रे,
अध्यक्ष बीटीबी

Web Title: BTB enriches farmers in floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.