शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवू- बोरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 01:19 IST2016-07-23T01:19:32+5:302016-07-23T01:19:32+5:30
शासकीय योजना लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार व प्रसाराची गरज असली तरी अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा,

शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवू- बोरकर
साकोली : शासकीय योजना लोकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार व प्रसाराची गरज असली तरी अधिकाऱ्यांनीही प्रामाणिकपणे योजनांचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा, असे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष तथा भाजपाचे महामंत्री बंडू बोरकर यांनी केले. तहसिल कार्यालय येथे आयोजित संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार खडतकर, नायब तहसीलदार चेतन मोरे, समितीचे सदस्य प्रकाश मेश्राम, श्रावण बोरकर, सरपंच आशा शेंडे, संजय गजापुरे, रामेश्वर करेकार, चिंतामन कापगते, एस. बी. डोंगरे, एफ. आर. तलमले, ए.डी. मेश्राम, एम. एफ. किरसान उपस्थित होते. बैठकीत श्रावणबाळ योजनेचे १२३ प्रकरण संजय गांधी निराधार योजनेचे १४५, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेचे ११४ असे एकूण ३८२ प्रकरण मंजूर करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)