शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
6
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
7
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
8
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
9
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
10
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
11
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
12
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
13
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
14
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
15
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
16
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
17
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
18
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
19
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
20
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!

पूल देत आहे इतिहासाची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:01 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ब्रिटिशांनी देशभर रस्ते आणि पुलाचे जाळे विणले. त्यातून त्यांनी आपले साम्राज्य सर्वत्र विस्तारले. नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारानजिक वैनगंगा नदीवरील पूल याच कारणासाठी उभारण्यात आला. तत्कालीन सीपी अँन्ड बेरार प्रांताचे गर्व्हनर सर मॉन्टेग्यू बटलर यांच्या हस्ते २० जुलै १९२९ मध्ये खुला करण्यात आलेल्या या पुलाला आता ९१ वर्ष पूर्ण होत आले असून तो शंभरीकडे वाटचाल करीत आहे.

ठळक मुद्देवैनगंगेचा पूल वारसा नव्वदीपार! : ब्रिटिशकालीन पुलाची ९१ वी वर्षपूर्ती, १९२९ मध्ये पुलाचे उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगेवरील ब्रिटीशकालीन पुलाला आता ९१ वर्ष पूर्ण होत आली तरी हा पूल ताठ मानेने उभा आहे. त्याचा कणा अजूनही मोडला नाही. या पुलाच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दुसरा नवीन पूल बांधला गेला आहे. परंतु, लहान पुलाचे महत्व कमी झालेले नाही. स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या पुलावरुन सुरक्षेच्या दृष्टीने जड वाहतूक बंद केली असली तरी दुचाकी व पायी वाहतूक सुरू आहे. हा पूल भंडारा जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देत आता शंभरीकडे वाटचाल करीत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची सोय व्हावी यासाठी ब्रिटिशांनी देशभर रस्ते आणि पुलाचे जाळे विणले. त्यातून त्यांनी आपले साम्राज्य सर्वत्र विस्तारले. नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारानजिक वैनगंगा नदीवरील पूल याच कारणासाठी उभारण्यात आला. तत्कालीन सीपी अँन्ड बेरार प्रांताचे गर्व्हनर सर मॉन्टेग्यू बटलर यांच्या हस्ते २० जुलै १९२९ मध्ये खुला करण्यात आलेल्या या पुलाला आता ९१ वर्ष पूर्ण होत आले असून तो शंभरीकडे वाटचाल करीत आहे. हा पूल होण्याआधी व त्यानंतरचा इतिहास मोठा रंजक आहे.देवगढ राजघराण्यातला गृहकलह शमवण्यासाठी नागपूरच्या रघुजी भोसल्यांनी १७३९ मध्ये उमरेड व पवनी येथील किल्ल्यांचा पाडाव करत भंडाऱ्यावर स्वारी केली. त्यांना वैनगंगा नदी नावांचा (डोंगा) पूल करून ओलांडावी लागली होती. नंतरच्या काळात नदीचे पात्र ओलांडण्यासाठी लाकडी पूल बांधण्यात यायचा. हा लाकडी पूल बांधण्यासाठी मजुरांना मजुरी म्हणून कवड्या दिल्या जायच्या. त्यावेळचे व्यवहार हे कवड्यांमधून व्हायचे. लाकडी पूलावरून या महामार्गावरील वाहतूक व्हायची. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामुळे तो पूल काढून टाकला जाई. या लाकडी पुलावरून स्वामी विवेकानंद यांनी विद्यार्थीदशेत घोडागाडीतून रायपूरपर्यंत प्रवास केला होता, असे जाणकार सांगतात.प्रत्येक पावसाळ्यात पुलावरील वाहतूक प्रभावित होत असल्याने व दळणवळणाची गैरसोय होत असल्याने ब्रिटीश कंपनीने जिल्हा प्रशासनाला पक्का पूल बांधण्यासाठी पत्र पाठविले होते. दरम्यानच्या काळात सीपी अँन्ड बेरार प्रांतचे गर्व्हनर मॉन्टेग्यू बटलर हे भंडारा येथे शासकीय बंगल्यात उतरले होते. त्या बंगल्यात खांबावरचे पंखे होते. (भंडारा येथील जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सकांचा बंगला ब्रिटीशकालीन आहेत.) त्यावेळी वैनगंगा नदीला पूर आला होता. तेव्हा भंडारा येथील प्रतिष्ठीत नागरिक रावसाहेब जकातदार यांनी गर्व्हनर बटलर यांचा बंगला गाठला. रावसाहेब जकातदार यांनी गर्व्हनर बटलर यांना पुराची स्थिती अवगत करुन दिली. गर्व्हनर बटलर यांनी ती स्थिती पाहताच वैनगंगा नदीवर पूल बांधण्याचे आदेश ब्रिटीश कंपनीला दिले. १९२९ मध्ये हा पूल बांधला गेला. २० जुलै १९२९ ही तारीख पुलाच्या उद््घाटनासाठी निश्चित करण्यात आली. उद््घाटनासाठी गर्व्हनर मॉन्टेग्यू बटलर हे स्वत: आले होते. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा पूल दळणवळणासाठी खुला करण्यात आला. या पुलावरून प्रवास करण्यासाठी ब्रिटिशांनी जकात कर लावला होता.उद्घाटनाच्या वेळी ‘बटलर गो बॅक’च्या घोषणा२० जुलै १९२९ रोजी वैनगंगेवरील पुलाचे उद््घाटन करण्यात आले. परंतु, या उद््घाटनाला भंडाºयातील कॉंग्रेसच्या मंडळींना निमंत्रण नव्हते. त्यामुळे या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला होता. त्यासाठी भंडारा, गोंदिया, तुमसर, नागपूर येथून आंदोलक भंडाºयात जमले होते. भंडारा येथील आताचा बस डेपो, बस स्टँड व कॉलेज रोड या तीन रस्त्यांवरून आंदोलक निघाले होते. आज अत्यंत गजबलेल्या कॉलेज रोडवर त्याकाळी दाट झाडी होती. जाण्यासाठी लहान रस्ता होता. पोलिसांनी तीनही रस्त्यांवर आंदोलकांना थांबविले होते. 'बटलर गो बॅक' अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या होत्या. त्यामुळेच पोलिसांच्या बंदोबस्तात पुलाचे उद््घाटन करण्यात आले होते.

टॅग्स :riverनदी