पुलाचे सुरक्षा कठडे तुटले, अपघाताची शक्यता
By Admin | Updated: March 16, 2016 08:30 IST2016-03-16T08:30:15+5:302016-03-16T08:30:15+5:30
वैनगंगा नदीवर पवनी-सिंदपुरी दरम्यान असलेल्या पुलावर दोनवेळा झालेल्या अपघाताने पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहे.

पुलाचे सुरक्षा कठडे तुटले, अपघाताची शक्यता
पवनी : वैनगंगा नदीवर पवनी-सिंदपुरी दरम्यान असलेल्या पुलावर दोनवेळा झालेल्या अपघाताने पुलावरील सुरक्षा कठडे तुटलेले आहे. रेलींग तुटलेले असल्याने अपघाताची शक्यता आहे. धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे तुटलेले रेलींग दुरूस्त करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
अखेर धानोरी रस्त्याच्या बांधकामाला मंजूर
पवनी : गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेला सिंगोरी-सेलारी मार्गे धानोरी रस्ता अखेर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील पहिल्या टप्प्यात मंजुर करण्यात आलेला आहे. कच्चा रस्त्यावरून बस सुरू आहे, अशा आशयाची बातमी यापूर्वी लोकमतने प्रसिद्ध केलेली होती. भोजापूर व गुडेगाव रेतीघाटावरून उत्खनन केलेली रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक याच मार्गाने होत असल्याने रस्ता वारंवार नादुरूस्त होत असतो. सिंगोरी-राहना-सेलारी ते धानोरीपर्यंतचा हा रस्ता १०.१० कि़मी. अंतराचा आहे. तालुकानिहाय दिलेल्या लक्षामध्ये ९.७० कि़मी. अंतर देण्यात आलेले आहे. यासंपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण झाल्यास ब्रम्हपुरीमार्गे सावरला एस.टी. बसेस बारमाही सुरू राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे पूर्णत: मजबुतीकरण करावे, अशी मागणी पं.स. सदस्य बंडू ढेंगरे यांनी केलेली आहे.