शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

शाखा अभियंता म्हणतात, आमच्याकडे तक्रारच नाही

By admin | Published: July 13, 2017 12:29 AM

हॅलो अन् जय हिंदचा आवाज बीएसएनएलने हिरावला ही बातमी लोकमतला प्रसिद्ध झाली.

अशीही बनवाबनवी : दोषाचे खापर एकमेकांवरराजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : हॅलो अन् जय हिंदचा आवाज बीएसएनएलने हिरावला ही बातमी लोकमतला प्रसिद्ध झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यानंतर एक वेगळेच सत्य बाहेर पडले. भारत संचार निगमच्या शाखा अभियंता म्हणाल्या, आमच्याकडे पोलीस स्टेशनची टेलिफोन बाबत कोणतीही तक्रार नाही. तथापी, या विषयावर दोन्ही बाजूचे अधिकारी आपल्या विभागाचा दोष आहे हे मानायला तयार नाही.मोहाडी पोलीस स्टेशनचा टेलिफोन बंद असतो अशी तक्रार लोकमतमध्ये वृत्त आल्यानंतर अनेकांनी बोलून दाखविली. या बाबत वास्तवही अनुभवास आले. ७ जुलै रोजी प्रस्तूत प्रतिनिधीने अनेकदा फोन केले. त्यानंतर फोन उचलला जात नाही म्हणून पोलीस स्टेशन गाठले. तिथे पोलीस डायरीवर एक हवालदार होते. मी परिचय दिला नाही. सरळ विचारल तुमचा टेलिफोन बंद आहे काय. मी लगेच ०७१९७-२४११२२ याच नंबरवर फोन केला आवाजच ऐकू येईना. तेव्हा एक शिपाई आले त्यांनी टेलिफोन मागील एका बटणला हात घातला. त्यांनीच पुन्हा रिंग करायला सांगितले. रिंग केले अन् आश्चर्य, रिंगचा आवाज ऐकायला आला. पुन्हा ८ जुलै, १० जुलै रोजी एका प्रकारची माहिती घेण्यासाठी टेलिफोन नंबरवर फोन केला. पण, रिंग जायची प्रतिसाद दिले जात नव्हते. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल तेलुरे यांच्या मोबाईलवर कॉल केल्यानंतर फोन बंद आहे. बीएसएनएल मोहाडी येथे तक्रार केल्याचे सांगितले.आज लोकमतमध्ये हॅलो अन् जयहिंद.... हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पोलीस अन् दूरसंचार विभागाच्या कानात रिंग वाजायला लागली. बीएसएनएल कार्यालय मोहाडी शाखेच्या शाखा अभियंता रिता बांते म्हणाल्या, आमच्याकडे पोलीस स्टेशन मोहाडीची टेलिफोन बंद बाबत कोणतीच तक्रार नाही. आज बातमी आल्यावर मी स्वत: चौकशी करून खात्री केली. आॅपरेटर नरेश गायधने यांना १२ जुलैला सकाळी ८.३० च्या दरम्यान पोलीस स्टेशनला जायला सांगितले. तिथे गेल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. इकडून रिंगचा आवाज ऐकू यायचा पण, टेलिफोनची रिंग वाजत नव्हती. त्यांनी टेलिफोनला बघितले. आवाज कमी, अधिक करण्याची बटण बघितले. कमी म्हणजे म्यूटवर बटण असल्याचे दिसले. पुन्हा पूर्ववत टेलिफोनवर आवाज येवू लागला. आॅपरेटरनी त्याच मोबाईलवरून शाखा अभियंता रिता बांते यांना फोन केले. टेलिफोनमध्ये दोष नव्हताच. त्याला जाणीवपूर्वक कुणीतरी छेडछाड करण्याचे कारस्थान करीत असल्याचे समजून आले. टेलिफोनवर येणारे फोन टाळण्याचा कट पोलीस स्टेशनमध्ये होत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. याबाबतीत पोलीस निरीक्षक सुनिल तेलुरे यांना विचारले असता ते पुन्हा सांगतात आम्ही सहा दिवसापूर्वी बीएसएनएलकडे लेखी तक्रार केली. केव्हा केली याची तारीख मात्र त्यांना देता आली नाही. तसेच काही वेळानंतर त्यांनी पुन्हा सांगितले मोहाडी बीएसएनएल मधील देशमुख यांच्याजवळ रजिष्टरमध्ये तक्रार नोंदविली गेली. पण, याबाबत तक्रारीची नोंदच नाही. असे शाखा अभियंता रिता बांते यांनी लोकमतला सांगितले. या प्रकरणानंतर मात्र प्रस्तूत प्रतिनिधीने मोहाडी पोलीस स्टेशनच्या टेलिफोनवर कॉल केला तो कॉल पटकन उचलला गेला. याबाबत कोण बनवाबनवी करतो याची शहानिशा होणे आवश्यक झाले आहे. या प्रकरणात दोघेही अधिकारी स्वत:वर दोष घ्यायला तयार नाहीत. एकमेकांवर दोषाचे खापर फोडले जात आहे. खरं कोणाचे मानावे हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. या प्रकरणाची वरिष्ठामार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.