रेल्वेतून पडून युवकाचे दोन्ही पाय निकामी
By Admin | Updated: July 21, 2015 00:35 IST2015-07-21T00:35:41+5:302015-07-21T00:35:41+5:30
रेल्वेस्थानकजवळ आल्याने सामान उतरविण्याची लगबग करताना पाय घसरल्याने एक युवक प्रवाशी गाडीतून खाली पडला.

रेल्वेतून पडून युवकाचे दोन्ही पाय निकामी
तुमसर रोड येथील घटना : रेल्वे सुरक्षा रक्षकांची पाठ
तुमसर : रेल्वेस्थानकजवळ आल्याने सामान उतरविण्याची लगबग करताना पाय घसरल्याने एक युवक प्रवाशी गाडीतून खाली पडला. त्याचे दोन्ही पाय कापले गेले. ही दुर्देवी घटना सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तुमसर रोड यार्डाजवळ घडली. दुर्देवी युवकाचे नाव आनंद गणेश बंधाटे (२२) रा.इंदिरा नगर देव्हाडी असे आहे.
आनंद इतवारी तुमसर तिरोडी प्रवाशी गाडीने प्रवास करीत होता. त्याच्याजवळ साहित्याची एक पोती होती. तुमसर रोड रेल्वे स्थानक जवळ आल्याने ती पोती उतरविण्याकरिता त्याने लगबग केली. रेल्वे डब्ब्याच्या दाराजवळ त्याचा पाय घसरल्याने तोल गेला. त्यातच तो गाडीखाली पडला. त्याच्या दोन्ही पाय कटले. नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला. (तालुका/शहर प्रतिनिधी)