बोअरवेल यांत्रिक मानधनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:21+5:302021-04-02T04:37:21+5:30

पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील हातपंप दुरुस्ती करण्याचे काम हातपंप यांत्रिकांना वेळी-अवेळी करावे लागते. हातपंप देखभाल करण्याचा मेहनतानावर त्या ...

Borewell deprived of mechanical honorarium | बोअरवेल यांत्रिक मानधनापासून वंचित

बोअरवेल यांत्रिक मानधनापासून वंचित

पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतच्या हद्दीतील हातपंप दुरुस्ती करण्याचे काम हातपंप यांत्रिकांना वेळी-अवेळी करावे लागते. हातपंप देखभाल करण्याचा मेहनतानावर त्या यांत्रिकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यांत्रिकांना मानधनासाठी मिळणारा निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पुरविला जात असल्याचे समजते.

गेल्या ६ महिन्यांपासून हातपंप यांत्रिकांना मानधन मिळाले नसल्याने, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हातपंप यांत्रिकांना नियमित मानधन मिळण्यासाठी संबंधित विभागाची डोळेझाक होत असल्याची नित्याचीच बाब आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करून, देणाऱ्या हातपंप यांत्रिकांना त्यांच्या कामाचा मोबदला दर महिन्यापोटी मिळण्यासाठी संबंधित विभाग गांभीर्याने दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.

गावपातळीवर काम करणाऱ्या या हातपंप यांत्रिकांनी आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना शुक्रवारी (दि.२६) लेखी निवेदन देऊन मानधन देण्याबाबत आग्रही मागणी केली. जिल्हा परिषदेच्या अन्य कोणत्या एका निधीतून मानधन देण्यासंबंधी कारवाई करावी, अशी मागणी हातपंप यांत्रिकांनी या निवेदनातून केली आहे.

Web Title: Borewell deprived of mechanical honorarium