ग्रंथ ही बाबासाहेबांची जागतिक स्तरावरची पुंजी

By Admin | Updated: January 23, 2016 00:55 IST2016-01-23T00:55:03+5:302016-01-23T00:55:03+5:30

आंबेडकरांचे बुद्ध कबिर आणि फुले असे त्यांचे तीन गुरू असले तरी त्यांना ज्यांनी खऱ्या अर्थाने घडविले ते प्रोफेसर सेलिमगम, जॉन डुयी व एडविन कॅनन हे होत.

The book is the world's largest bank of Babasaheb | ग्रंथ ही बाबासाहेबांची जागतिक स्तरावरची पुंजी

ग्रंथ ही बाबासाहेबांची जागतिक स्तरावरची पुंजी

फार्मसी महाविद्यालयात संविधान सप्ताह : नितनवरे यांचे प्रतिपादन
साकोली : आंबेडकरांचे बुद्ध कबिर आणि फुले असे त्यांचे तीन गुरू असले तरी त्यांना ज्यांनी खऱ्या अर्थाने घडविले ते प्रोफेसर सेलिमगम, जॉन डुयी व एडविन कॅनन हे होत. ज्ञानसाधनेच्या काळातील या गुरूचे अत्याधिक महत्व त्यांच्या जीवनात होते. व्यासंग कसा असावा हे त्यांच्या ग्रंथसंपदेवरून दिसून येते. ग्रंथ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जागतिक स्तरावरील पूंजी आहे, असे प्रतिपादन मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील प्रा. डॉ. अनिल नितनवरे यांनी केले ते वैनगंगा बहुउद्देशिय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर फार्मसी महाविद्यालयात बोलत होते.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त संविधान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनिल नितनवरे, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विनय लाऊतरे तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दामोदर गौपाले हे होते.
डॉ. नितनवरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूषांचे महापुरूष असून ते संपूर्ण भारत देशाचा गाभा आहेत. संस्कृत परंपरेने त्यांना कधीकोळी नाकारले असले तरी, त्यांचा सामाजिक दृष्टिकोन खोलवर होता.
संविधान सप्ताहाच्या निमित्ताने, निबंध स्पर्धा, वादविवाद व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेते श्वेत जवंजाळ, प्राची बारसागडे, शुभम चांदेवार, विद्या बहेकार, रेणुका कावळे, नेहा कापगते, प्रणय कोरे, प्रकाश डोंगरवार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संचालन प्रा. अनिल साव, आभार प्रा. भोजराज सातपुते यांनी केले. कार्यक्रमासाठी सचिन गजभिये, मनिष बेहेती, प्रा. निकी बिंझेवार, अनिल झिंगरे, रवी भोंगाने आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The book is the world's largest bank of Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.