बोलेरोच्या चाकाचे काढले ‘नट’

By Admin | Updated: February 14, 2016 00:44 IST2016-02-14T00:44:02+5:302016-02-14T00:44:02+5:30

सीतासावंगी येथून कॉलेज व्यवस्थापनांशी चर्चा करून तुमसरकडे परत येताना किसान गर्जनाचे

Bolero Chalk removed 'Nut' | बोलेरोच्या चाकाचे काढले ‘नट’

बोलेरोच्या चाकाचे काढले ‘नट’

राजेंद्र पटले बचावले : गोबरवाही पोलिसात तक्रार
तुमसर : सीतासावंगी येथून कॉलेज व्यवस्थापनांशी चर्चा करून तुमसरकडे परत येताना किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या चारचाकी वाहनाच्या एका टायरचे नट काढल्याने वाहनाचे चाक काही अंतरावर निघाले. नशिब बलवत्तर म्हणून पटले व त्यांचे सहकारी बचावले. या प्रकरणी संशयिताविरूद्ध पटले यांनी गोबरवाही पोलिसात तक्रार दाखल केली.
सीतासावंगी येथे विवेकानंद तंत्रनिकेतन महाविद्यालय असून प्राध्यापक व कॉलेज व्यवस्थापकाशी विद्यार्थ्यांचा वाद सुरू होता. १५ दिवसापूर्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी लेखनी बंद आंदोलन केले होते. कॉलेज व्यवस्थापनाने प्रभारी प्राचार्य म्हणून पंकज भुते यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांना अधिकार दिले नाही.
या चर्चेकरिता किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले सहकाऱ्यांसोबत हे शुक्रवारी सायंकाळी कॉलेजमध्ये गेले होते. व्यवस्थापनाकडून पंकज भुते यांना लेखी आदेश प्राप्त करून दिले. त्यानंतर चारचाकी वाहनाने ते सीतासावंगीहून गोबरवाहीकडे निघाले.
दरम्यान, गोबरवाहीजवळ चारचाकी वाहनाचा एक चाक निघाला. सुदैवाने वाहन उलटले नाही. हा जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पटले यांनी व्यवस्थापनावर केला आहे. यासंदर्भात पटले यांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात व्यवस्थापनाविरोधात तक्रार केली आहे. राजेंद्र पटले यांच्यासोबत वाहनात प्रभारी प्राचार्य पंकज भुते, कमलाकर निखाडे, स्वप्नील भुसारी, लोकेश बमनोटे, अशोक उईकेसह चालक प्रकाश चौधरी यांचा समावेश होता. (तालुका/शहर प्रतिनिधी)

Web Title: Bolero Chalk removed 'Nut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.