जलयुक्त शिवार योजना वरदान

By Admin | Updated: August 19, 2015 01:08 IST2015-08-19T01:08:08+5:302015-08-19T01:08:08+5:30

पुर्वीची घनदाट जंगले आता दिसेनाशी झाली. त्याचा विपरित परिणाम वातावरणातुन दिसून येतो.

Boiled water scheme boon | जलयुक्त शिवार योजना वरदान

जलयुक्त शिवार योजना वरदान


साकोली : पुर्वीची घनदाट जंगले आता दिसेनाशी झाली. त्याचा विपरित परिणाम वातावरणातुन दिसून येतो. पूर्वीसारखा धो-धो येणारा पाऊस आता येत नाही. त्यामुळे शेतीला अडचण होत आहे. म्हणूनच शासनाने शेतकऱ्याच्या हितासाठी जलयुक्त शिवार ही योजना काढून शेतकऱ्यांना त्यांना सोयीच्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे, असे प्रतिपादन आमदार बाळा काशिवार यांनी केले.
तालुक्यातील बरडकिन्ही येथे कृषी विभागामार्फत महादेव बोरकर यांच्या शेततळ्याच्या ठिकाणी जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी आ. काशिवार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते, अशोक कापगते, सभापती धनपाल उंदिरवाडे, पंचायत समिती सदस्य राजकुमार पुराम, सरपंच जितेंद्र झोडे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले,तहसिलदार डॉ. हंसा मोहणे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सांगळे, तालुका कृषी अधिकारी जी. के. चौधरी, खंडविकास अधिकारी पी. जी. झंझाड, कृषी अधिकारी के. एम. बोरकर, मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम, कृषी पर्यवेक्षक राधेशाम खोब्रागडे, कृषी सहायक पठाण, जी. बी. साठवणे उपस्थित होते.
आ. काशिवार म्हणाले, मानवाने वातावरणाशी जुळवून घ्यावे. कारण अलीकडच्या काळात मानवाकडून मोठ्या चुका झाल्या व त्याचा परिणाम आज आपण भोगत आहोत. यात सुधारणे करणे महत्वाचे आहे.
यावेळी आमदार बाळा काशिवार यांचे हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Boiled water scheme boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.