बोगस बियाण्याने धान उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 06:00 AM2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:37+5:30

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे.

Bogus seeds trouble paddy growers | बोगस बियाण्याने धान उत्पादक अडचणीत

बोगस बियाण्याने धान उत्पादक अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणी झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली.
भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धान बीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च केला. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. मात्र धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. निसवण्याच्या वेळी धान तिसर, चौसर निसवत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
विनोद भोपे या शेतकऱ्याने एका कंपनीचे बियाणे विकत घेतले. ते बियाणे बोगस निघाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. पांजरा येथील शेतकरी सुरेश रामटेके यांनी विकत घेतलेले बियाणेही असेच बोगस निघाले. देवधान सहा एकरात कसा तयार झाला याची तक्रार मोहाडी कृषी अधिकाऱ्यांकडे केली. नेरी येथील शेतकरी अख्तरबेग मिर्जा यांच्या शेतातसुद्धा बनावट धान उगवले. खमाटा येथील अनेक शेतकऱ्यांनाही असाच अनुभव आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु कृषी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांनाच दोष देत आहेत. शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊनही कृषी विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, अख्तरबेग मिर्झा, विनोद भोपे, सुरेश रामटेके, प्रमोद एंलजवार, ज्ञानेश्वर निकुरे आदी उपस्थित होते. बोगस धान विकणाºया कंपनी आणि कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

कृषी केंद्र चालकांना अभय कुणाचे?
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे निघाल्याच्या तक्रारी आहेत. परंतु कृषी विभाग याबाबत बोलायलाही तयार नाही. शेतकरी तक्रार घेऊन जातात, परंतु त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. कृषी विभागाचे अधिकारी आणि कृषी केंद्र संचालकांचे साटेलोटे सर्वांनाच माहित आहे. यामुळेच कुणी कारवाईसाठी पुढे येत नाही. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयही डोळ्यावर पट्टी बांधून असल्यासारखे दिसत आहेत. यात शेतकºयांचा मात्र जीव जात आहे.

Web Title: Bogus seeds trouble paddy growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती