शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

गोसे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, एकच खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 15:20 IST

जाखची घटना : खिशातील आधारकार्डवरून पटली ओळख

कोंढा - कोसरा (भंडारा) : गोसे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना भंडारा तालुक्यातील जाख येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मृतकाच्या खिशातील आधारकार्ड वरून त्याची ओळख पटली.

कार्तिक सोमाजी मडावी (२१) रा. धारगाव ता. भंडारा असे मृताचे नाव आहे. जाख गावाजवळील धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकरी शैलेश शेळके यांना दिसला. त्यांनी लगेच जाखचे पोलीस पाटील सुभाष पडोळे यांना माहिती दिली. त्यांनी अड्याळ पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

गावातील तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. सुरूवातीस ओळख पटविण्यात अडचण येत होती. काही वेळात अंगावरील कपड्यांची तपासणी केली असता आधार कार्ड आढळले. त्यावरून तो कार्तिक मडावी असल्याचे पुढे आले.

तरूणाची हत्या की आत्महत्या

धारगाव येथील तरुणाचा मृतदेह आढळून जाख येथे आढळून आल्याने त्याने आत्महत्या केली की, त्याची कुणी हत्या केली असा संशय व्यक्त केला जात आहे. अड्याळ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. तूर्तास मृतकाचा मोठा भाऊ नागेश्वर मडावी याच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच एकच खळबळ उडाली आहे. ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार फुलचंद मेश्राम तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पDeathमृत्यूbhandara-acभंडारा