बेपत्ता तरुणाचा अखेर वैनगंगेत मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:36 IST2021-09-11T04:36:50+5:302021-09-11T04:36:50+5:30

प्रकाश राजू भाेपे (वय २३), रा. भगतसिंग वाॅर्ड, नवीन टाकळी भंडारा असे मृताचे नाव आहे. त्याने बुधवारी रात्री वैनगंगा ...

The body of the missing youth was finally found in Waingang | बेपत्ता तरुणाचा अखेर वैनगंगेत मृतदेह आढळला

बेपत्ता तरुणाचा अखेर वैनगंगेत मृतदेह आढळला

प्रकाश राजू भाेपे (वय २३), रा. भगतसिंग वाॅर्ड, नवीन टाकळी भंडारा असे मृताचे नाव आहे. त्याने बुधवारी रात्री वैनगंगा नदीपात्रात उडी घेतली हाेती. सकाळपासून त्याचा शाेध जारी हाेता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी नऊ वाजता बचाव पथकाला त्याचा मृतदेह कारधा पाेलीस ठाण्याच्या हद्दीत वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. त्याने नेमकी काेणत्या कारणाने उडी घेतली हे मात्र कळू शकले नाही.

दरम्यान, गत दाेन दिवसांत वैनगंगा नदीत पाचजणांनी उडी घेतली हाेती. त्यांपैकी दाेघांचे मृतदेह हाती आले. त्यात गुरुवारी राहुल वामन तायडे (३०, रा. पिंपळगाव ता. लाखनी) यांचा समावेश हाेता. शुक्रवारी प्रकाश भाेपे यांचा मृतदेह आढळून आला. गुरुवारी सकाळी वैनगंगेच्या माेठ्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा भंडारा पाेलीस शाेध घेत आहेत. अवघ्या दाेन दिवसांत पाचजणांनी उडी घेतल्यानंतर दाेघांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: The body of the missing youth was finally found in Waingang