मंडळ अधिकारी तलाठी निलंबित

By Admin | Updated: June 10, 2016 00:32 IST2016-06-10T00:32:34+5:302016-06-10T00:32:34+5:30

जिल्हाधिकारी व ठाणेदार यांनी बेटाळा रेतीघाटावर धाड घातली होती. त्यावेळी तीन पोकलँड, १ ट्रक व १ पाण्याची टँक ताब्यात घेण्यात आले.

Board official suspended Talathi | मंडळ अधिकारी तलाठी निलंबित

मंडळ अधिकारी तलाठी निलंबित

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : कर्तव्यात हयगय भोवली
मोहाडी : जिल्हाधिकारी व ठाणेदार यांनी बेटाळा रेतीघाटावर धाड घातली होती. त्यावेळी तीन पोकलँड, १ ट्रक व १ पाण्याची टँक ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मंडळ अधिकारी एच.एस. कटरे व तलाठी जी.बी. रहांगडाले यांना बोलावूनही ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दोघांना निलंबित केले.
बेटाळा रेती घाटासंबंधाने तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होत्या. अवैधरित्या पोकलँड टाकून रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरु असल्याची माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मोहाडी ठाणेदार गुंजवटे यांना सोबत घेत बेटाळा रेतीघाटावर धाड घातली. धाडीदरम्यान घाटावर एकच ्नखळबळ उडाली. वाहनचालक मालक तसेच घाट चालकही घटनास्थळावर वाहन सोडून नदीतून पायीच पळाले. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडून रस्ता अडवून धरला होता. कारवाईत तीन पोकलँड मशीन, १ ट्रक व १ पाण्याचा टँकर ताब्यात घेण्यात आले.
सायंकाळी मोहाडी तहसीलदार धनंजय देशमुख यंच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. वाहन सोडून चालक पसार झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती मागवून चालक मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार सुहास चौधरी यांचेकडून देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Board official suspended Talathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.