पालकसभा ठरली वादळी

By Admin | Updated: July 10, 2015 01:14 IST2015-07-10T01:14:18+5:302015-07-10T01:14:18+5:30

शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून विद्यार्थी व पालक शैक्षणिक साहित्य व गणवेश आदींच्या लगबगीमध्ये ....

The Board of Governors has been stormy | पालकसभा ठरली वादळी

पालकसभा ठरली वादळी

पालकांमध्ये असंतोष : गणवेष वाटपाचा वाद चिघळला
भंडारा: शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असून विद्यार्थी व पालक शैक्षणिक साहित्य व गणवेश आदींच्या लगबगीमध्ये असतानाच स्थानिक महिला समाज शाळेच्या प्रशासनाने अचानकरित्या गणवेश बदलल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला असून खुल्या बाजारातून गणवेश खरेदी करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील महिला समाज शाळा ही नावाजलेली शाळा आहे. या शाळेत गरिबांपासून तर श्रीमंतांची मुले सुद्धा शिक्षण घेतात. प्रत्येक शाळेचा एक स्वतंत्र असा गणवेश असतो. या गणेवशामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांची ओळख होते. मागील दशकभरापासून शाळेचा गणवेश बदलविण्याचा निर्णय यावर्षी शाळा प्रशासनाने घेतला. हा निर्णय दोन वषापुर्वीच घेण्यात आल्याचे पालक सभेत शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निर्णयाला पालकांचा कोणताही विरोध नाही. मात्र शाळा प्रशासनाने शहरातील शास्त्री चौकात असलेल्या एका व्यावसायीकाला शाळेचे गणवेश विक्रीचे कंत्राट दिले. एकाच व्यावसायिकाकडे शाळेचा गणवेश उपलब्ध करून दिल्याने एक प्रकारे शाळा प्रशासनाने पालकांवर अन्यायच केला आहे. खुल्या बाजारभावापेक्षा या गणवेशाची किंमत अधिक आहे.
काही पालक शाळा सुरू होण्याच्या दोन दिवसापूर्वी सदर दुकानात गेले असता, पालकांकडून एका गणवेशाचे ५५० रुपए तर दोन दिवसांनी त्याच गणवेशाची किंमत काही पालंकांकडून ७५० ते ८०० रुपये घेण्यात आले. काही पालकांनी गणवेशासंदर्भात अन्य दुकानांमध्ये विचारणा केली असता, त्यांना ४०० ते ५०० रुपयांचा हा गणवेश मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. जो गणवेश सदर दुकानदाराकडून दिल्या जात आहे. त्या किंमतीच्या तुलनेत गणवेशाचा दर्जा सुद्धा नाही.
या दुकानदारांकडून अधिकचे पैसे घेऊन आर्थिक लूट होत असल्याने पालकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. याबद्दल उपस्थित पालकांनी मुख्याध्यापिका यांची विचारणा केली. सदर निर्णय शाळा प्रशासनाचा आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावर तोडगा काढण्यासाठी पालकसभा घेण्यात असता ती सभाही वादळी ठरली.
गणवेश बदलल्याच्या कारणामुळे महिला समाज शाळेत पालकसभा घेण्यात आली. सभेत २०० च्यावर पालकांनी हजेरी लाऊन पुन्हा गणवेशाचा विषय चर्चेत आणला. एकाच दुकानातून गणवेश खरेदी करण्याची सक्ती न करता खुल्या बाजारातून खरेदी करण्याची सूट देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली. परंतु, शाळा प्रशासनाने १४ आॅगस्टपर्यंत त्याच दुकानातून गणवेश खरेदी करण्यास सांगितले. शाळा प्रशासनाने गणवेशाच्या विषयावर तोडगा न काढता सभा गुंडाळल्याने पालकांमध्ये शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे. पालक व शाळा प्रशासन आपआपल्या निर्णयावर ठाम असल्याने हे प्रकरण भविष्यात काय वळण घेते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सभेला संस्था अध्यक्ष गुप्ते, सचिव मोघे, मुख्याध्यापिका चंदेल यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The Board of Governors has been stormy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.