जलयुक्त शिवार ठरली वरदान

By Admin | Updated: July 24, 2016 00:31 IST2016-07-24T00:31:48+5:302016-07-24T00:31:48+5:30

जलयुक्त शिवार योजनांच्या कामामुळे जलसिंचनाला मोठी मदत मिळाली आहे.

Boar | जलयुक्त शिवार ठरली वरदान

जलयुक्त शिवार ठरली वरदान

२.७८ कोटींची १०० कामे : पाच विभागांची कामगिरी 
युवराज गोमासे  मोहाडी
जलयुक्त शिवार योजनांच्या कामामुळे जलसिंचनाला मोठी मदत मिळाली आहे. यातून जलसंधारणाच्या अनेक कामांना गती मिळाली. सन २०१५-१६ वर्षात सामाजिक वनीकरण, पंचायत समिती, जिल्हा परिषदर लघु पाटबंधारे, जलसंधारण विभाग व वनविभागाची १५ गावात सुमारे ११७ पैकी १०० कामे करण्यात आली. यातून ६१.४२ हेक्टर आर. शेती सिंचनाखाली येणार आहे.
मोहाडी तालुका वैनगंगा नदीमुळे दोन भागात विभाजीत झालेला आहे. पूर्वेकडील भाग कोका जंगल टेकड्यांनी वेढलेला आहे. वैनगंगा २ ते ३ कि.मी. अंतरावरून वाहत असताना भूगर्भात पाण्याचा पाहिजे तसा साठा नाही. त्यामुळे विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडतात. खरीप पीक पाण्याअभावी नुकसानग्रस्त ठरते. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो. पश्चिमेकडील भाग काही प्रामणात का होईना तुलनेत सिंचनक्षम आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी या भागात पोहचते. मात्र रब्बी पिकांना सिंचनाची सोय होत नव्हती. स्वत:च्या पाण्याच्या सुविधा नसल्याने कधी एका पाण्याने शेतीचे नुकसान व्हायचे. ही परिस्थिती पालटण्यास मदत झाली ती जलयुक्त शिवार योजनेमुळे. या योजनांतून पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. मजगी, मजगी पुनर्जीवन, बोडी नूतनीकरण, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण, केटी वेअर दुरुस्ती, लपा तलाव दुरुस्ती, साखळी बंधारा, पाणी साठवण तलाव, साखळी सिमेंट बंधारा आदी कामे करण्यात आली. जि.प. लघुपाटबंधारे विभागांमार्फत साखळी बंधारा, पाणी साठवण तलावांची जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत १०८ कामे सुरु होवून १०० कामे पूर्ण करण्यात आली. तर ८ कामे प्रगतीपथावर असून २.७८ कोटींचा खर्च कामांवर झाला. यामुळे ६१.४२ हेक्टर आर शेती सिंचनाखाली आहे.

Web Title: Boar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.