लोकमतच्या वतीने तुमसर येथे गुरुवारी रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:59+5:302021-07-14T04:40:59+5:30

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, ...

Blood donation Mahayagya on Thursday at Tumsar on behalf of Lokmat | लोकमतच्या वतीने तुमसर येथे गुरुवारी रक्तदान महायज्ञ

लोकमतच्या वतीने तुमसर येथे गुरुवारी रक्तदान महायज्ञ

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार बाळासाहेब टेढे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, नायब तहसीलदार अशोक पाटील, खंडविकास अधिकारी धीरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. गोमलाडू, पोलीस निरीक्षक राम शिखरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन बाळबुधे, डॉ. मधुकर लांजे, बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन मिसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. कुरेशी, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितीरमारे, नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवचंद ठाकरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर राऊत, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष राजेश पटले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, माजी नगरसेवक योगेश सिंगणजुडे, माजी पंचायत समिती उपसभापती शिशुपाल गोपाले, सुरेश रहांगडाले, भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष कल्याणी भुरे, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर कारेमोरे, बाजार समिती संचालक बालकदास ठवकर, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, विकास फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर, नंदू रहांगडाले, जनता विद्यालयाचे विज्ञान शिक्षक पंकज बोरकर, शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखिल कटारे, आदिवासी सेवक अशोक उईके, सामाजिक कार्यकर्ता तोशल बुरडे, प्रफुल्ल वराडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज उकरे उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिरासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रा. कमलाकर निखाडे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी मोहन भोयर (९४२२८२४०२८), शहर प्रतिनिधी राहुल भुतांगे (९४२२१३३३४४), लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) सखी मंच तालुका संयोजिका रितू पशिने (८१७७९३२६१३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बालविकास मंच संयोजक ललित घाट बांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Blood donation Mahayagya on Thursday at Tumsar on behalf of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.