भंडाराच्या माधवनगर गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:21+5:302021-09-13T04:34:21+5:30

यावेळी पराग कोरे, चंद्रशेखर गायधने, सारंग वाघाये, नोवेल सिंगनजुडे, विकी खोत, रवींद्र कविश्वर, प्रवीण मोहरीर, रजत अलवार, शालिनी प्रीतम ...

Blood donation camp by Madhavnagar Ganeshotsav Mandal of Bhandara | भंडाराच्या माधवनगर गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर

भंडाराच्या माधवनगर गणेशोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर

यावेळी पराग कोरे, चंद्रशेखर गायधने, सारंग वाघाये, नोवेल सिंगनजुडे, विकी खोत, रवींद्र कविश्वर, प्रवीण मोहरीर, रजत अलवार, शालिनी प्रीतम राजाभोज, स्वप्निल आजनकर, नरेंद्र मानापुरे हर्षल बांते, संदीप मारोडकर, साहिल सुलाखे, विशेष म्हणजे गौरी खोटेले, वर्षा खोटेले आई अणि मुलीने एकत्रित येऊन रक्तदान केले. याप्रसंगी प्रीतम राजाभोज यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करायला सुरुवात करून ८१ वेळा रक्तदान केले. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन खासदार सुनील मुंडे व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. डॉ. अतुल टेंभुर्णी व त्यांच्या सहकारी सीमा तिजारे, राजू नागदेवे, रमेश मुरकुटे, राजश्री नागपुरे, अभिषेक लांजेवार, गुरुदेव बावनकुळे, व माधवनगर रहिवासी डॉ. रवींद्र कुकडे, डॉ. अभिजित तानेलवार यांच्या योगदानातून रक्तदान शिबिराला प्रचंड उत्साह मिळाला. अभिषेक हटवार यांनी जन्मदिवसानिमित्त रक्तदान केले. माधवनगर कार्यकारिणी व गणेश उत्सव कमिटी रवींद्र तायडे, संजय आयलवार, प्रा. वासुदेव मोहुले, विलास गायधने, अमोल काटेखाये, शुभम चौधरी, वसंत हुमे, गोविंद कापगते, देवेंद्र मेंढे, रोखपाल सुलाखे, संजय खोटेले, नरेश गोबाडे, मुकेश रामटेके आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अविनाश चौधरी यांनी केले.

Web Title: Blood donation camp by Madhavnagar Ganeshotsav Mandal of Bhandara