मोहाडी येथे ६० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:36 IST2021-03-27T04:36:48+5:302021-03-27T04:36:48+5:30
२६ लोक ०१ के मोहाडी : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

मोहाडी येथे ६० जणांचे रक्तदान
२६ लोक ०१ के
मोहाडी : नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून रक्तदानाचा महाविक्रम स्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने मोहाडी येथे आयोजित रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराच्या सुरुवातीला शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी कोरोनासारख्या कठीण काळामध्ये डॉक्टरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी वैद्यकीय सेवा पुरविली त्याबद्दल त्यांना ‘कोरोना योद्धा’ सन्मानपत्र देण्यात आले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रशांत थोटे, डॉ. शरद गोमासे, डॉ. योगेश गिरेपुंजे, डॉ. विजय सव्वालाखे, डॉ. अशोक जिभकाटे, डॉ. प्रशांत चकोले, डॉ. चेतन भागवतकर, डॉ. सुरेश बुधे, डॉ. उल्हास बुराडे, डॉ. योगेश बुराडे, डॉ. प्रवीण फेंडर, डॉ. सुमित मदनकर, डॉ. श्रीकांत मोहतुरे, डॉ. युवराज जमईवार, मोहाडी तालुका पत्रकार संघाचे सिराज शेख, अफरोज पठाण, नरेंद्र निमकर, राजू बांते, सुनील मेश्राम, यशवंत थोटे, किराणा व्यापारी संघटनेचे विलास वाडीभस्मे, तालुका केमिस्ट असोसिएशनचे हितेश साठवणे, रेवती बारई तसेच सामाजिक कार्यकर्ते पलाश पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रशांत थोटे यांनी केले होते.