जंगल व नदीपात्रातून नाकाबंदी कुचकामी

By Admin | Updated: October 11, 2014 01:18 IST2014-10-11T01:18:06+5:302014-10-11T01:18:06+5:30

तुमसर विधानसभा क्षेत्र जिल्हयाचे अंतिम टोक असून मध्य प्रदेशाच्या सीमा दक्षिण दिशेने लागलेल्या आहेत.

Blockade of waste from the forest and river banks | जंगल व नदीपात्रातून नाकाबंदी कुचकामी

जंगल व नदीपात्रातून नाकाबंदी कुचकामी

तुमसर : तुमसर विधानसभा क्षेत्र जिल्हयाचे अंतिम टोक असून मध्य प्रदेशाच्या सीमा दक्षिण दिशेने लागलेल्या आहेत. सातपुडा पर्वतरांगा असल्यामुळे हा परिसर घनदाट वनराईने वेढलेला आहे. बावनथडी व वैनगंगा नदीने येथे सीमा निश्चित केली आहे. तुमसर-बालाघाट व तुमसर-वाराशिवनी या आंतरराज्यीय महामार्गावर हा मतदारसंघ आहे. प्रमुख मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरीही नदीपात्रातून पायवाटेने मद्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरु आहे.
तुमसर विधानसभा मतदार क्षेत्रात मध्यप्रदेशातून सहज नदीपलीकडून प्रवेश करता येते. या मार्गाने मद्य व पैशाची खेप दाखल होते म्हणून निवडणूक आचार संहितेनंतर नाकाडोंगरी व बपेरा येथे नाकेबंदी सुरु झाली होती. पोलिसांचा खडा पहारा येथे आहे. नाकाडोंगरी येथे वनविभागाने तपासणी नाका उभा केला आहे. आंतरराज्यीय महामार्गावर नाकाबंदी सुरु असल्याने तस्करांनी आपला मार्ग जंगलातून शोधला आहे. सीमावर्ती गावातील जंगल व रस्ते या तस्करांना माहिती आहेत. नाकाबंदीमुळे वाहनातून चोरट्या मार्गाने मद्य आणि पैसा आणण्यास निश्चितच आळा बसला. मद्य व पैशाची खेप महाराष्ट्रात दाखल कशी होईल याची रणनिती तस्करांनी आखली आहे.
महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा तुमसर पासुन ते नागपुर पर्यंत दिल्या आहेत. मध्यप्रदेशातील नागरिक सहज महाराष्ट्रात दाखल होतात. व्यापार व बाजाराकरिता त्यांचे येणे-जाणे आहे. सोंड्या, नाकाडोंगरी, बपेरा, हिवरा बाजार, सितेकसा, चिखली, देवनारा, आष्टी कवलेवाडा, पाथरी या मार्गाने अवैधरित्या मद्य व पैसा येण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात मद्य स्वस्त दरात मिळत असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याकरिता उमेदवार मद्याच्या सर्रास वापर करतात. चोरट्या मार्गाने समर्थकाकडून वापर चालविला आहे. बावनथडी व वैनगंगा नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. या नदीपात्राचा वापर तस्करांकडून केल्या जात आहे.
वनविभागाचे नाकाडोंगरी व लेंडेझरी हे दोन वनपरिक्षेत्र या परिसरात आहेत. वनविभागाचे नाके सुध्दा जंगलात असते, परंतु मागील अनेक महिन्यापासून या जंगलव्याप्त परिसरात वनविभागाने कोणतीच ठोस कार्यवाही केल्याची दिसत नाही. वृक्षतोड, वन्यप्राणी शिकार येथे घटना घडल्या आहेत. मॅग्नीजचे अवैध उत्खनन येथे सुरुच आहे. जंगलव्याप्त परिसरात तुमसर तालुक्यातील ४५ गावे येतात. या गावांना जंगल तुडवतच गावे लागते. घनदाट जंगल असल्याने कर्मचारी सुध्दा जंगलात जाण्यास धजावत नाही. तस्कर या संधीचा फायदा घेत आहेत. पोलिसांच्या जवाबदारीसोबतच येथे वनविभागाचीही तितकीच जबाबदारी आहे. अनेक वनकर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा तक्रारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Blockade of waste from the forest and river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.