अशिक्षित मुकेशची सुशिक्षितांना चपराक

By Admin | Updated: July 14, 2014 23:48 IST2014-07-14T23:48:06+5:302014-07-14T23:48:06+5:30

ढिगभर पदव्या घेऊन दुनियाभराच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन नोकरीसाठी वनवण फिरणाऱ्या लाखो बेरोजगारांसमोर अशिक्षित पवनी येथील मुकेश उमराव बोकडे याने नवा आदर्श उभा केला आहे.

Blinds of uneducated Mukesh's teachings | अशिक्षित मुकेशची सुशिक्षितांना चपराक

अशिक्षित मुकेशची सुशिक्षितांना चपराक

इच्छाशक्ती : कान साफ करून चालवितो कुटुंबाचा गाडा
भुयार : ढिगभर पदव्या घेऊन दुनियाभराच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन नोकरीसाठी वनवण फिरणाऱ्या लाखो बेरोजगारांसमोर अशिक्षित पवनी येथील मुकेश उमराव बोकडे याने नवा आदर्श उभा केला आहे.
साहेबगिरीच्या नादात आयुक्त वाया घालविणाऱ्या सुशिक्षित, उच्चशिक्षित बेरोजगारांना एक दिशा मिळू शकेल, असाच मुकेशचा उपक्रम, आजच्या युगात पैसे कमविणे महत्त्वाचे आहे. शेकडो पदव्या अंगाला चिकटवून पोट भरत नसते. सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची फौज असताना आपण शिकलो नाही. या स्पर्धेत आपला निभाव कसा लागेल या विवंचनेत रडत बसण्यापेक्षा मनात इच्छाशक्ती असली तर आपल्या अंगी असलेल्या कलेद्वारे आपल्या कुटुंबाचा पोट भरू शकतो हा निश्चय केला व तो यशस्वी झाला.
पवनी येथील मुकेश उमराव बोकडे हा घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नाही. परंतु त्याने हिंमत सोडली नाही. आपल्याकडे असलेल्या कानसफाईची कला आपल्या जीवनात कलाटणी देऊ शकतो, असे त्याला वाटले व तो वयाच्या १८ व्या वर्षापासून लोकांचे कान सफाईचे काम करू लागला. कान हा मानवाच्या शरीरातील एक महत्त्वाचा व नाजूक अवयक आहे. मात्र कानात गेलेला मळ, धान कीटक किंवा काम करताना कानात गेलेला चणा, दगड, वटाणा यासारख्या वस्तू तो कुठल्याही प्रकारे दुखापत न करता मोठ्या सफाईने काढून तो कान साफ करून देतो. एरव्ही डॉक्टर ५०० ते १००० रूपये लागणारा खर्च तो ५० व ६० रूपयात दूर करतो तर निव्वळ कान सफाईचे २० रूपये घेतो. दिवसभरात २०० ते ३०० रूपये कमाई करून कुटुंबात असलेल्या पत्नी, एक मुलगा व दोन मुलींना उदरनिर्वाह करतो.
एक अशिक्षित युवक स्वबळावर स्वत:चे व कुटुंबाचे पोट भरतो तर दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगार रिकामे फिरताना दिसतात.काम मिळत नाही अशी उगीचच ओरड न करता स्वत:चा व्यवसाय थाटून किंवा अंगी असलेल्या गुणांचा योग्य वापर केला व मनात इच्छाशक्ती असली तर मनुष्य सहजरीत्या पोट भरू शकतो. हेच मुकेश बोकडेने सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहे. (वार्ताहर)

Web Title: Blinds of uneducated Mukesh's teachings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.