भाजपचे सिंगनजुडे, ठवकर काँग्रेसमध्ये

By Admin | Updated: October 20, 2015 00:45 IST2015-10-20T00:45:51+5:302015-10-20T00:45:51+5:30

भारतीय जनता पार्टीचे मनोहर सिंगनजुडे व चुन्नीलाल ठवकर या दोन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

BJP's Singhjaude, in Thavkar Congress | भाजपचे सिंगनजुडे, ठवकर काँग्रेसमध्ये

भाजपचे सिंगनजुडे, ठवकर काँग्रेसमध्ये

भंडारा : भारतीय जनता पार्टीचे मनोहर सिंगनजुडे व चुन्नीलाल ठवकर या दोन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टिळक भवन मुंबई येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात प्रवेश घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरुपम, माजी आमदार सेवक वाघाये उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून माजी आमदार सेवक वाघाये यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी प्रवेश केला असून या दोघांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती वाघाये यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: BJP's Singhjaude, in Thavkar Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.