भाजपचे बाळा काशीवार विजयी

By Admin | Updated: October 19, 2014 23:17 IST2014-10-19T23:17:21+5:302014-10-19T23:17:21+5:30

साकोली विधानसभेच्या मतमोजणीत भाजपचे राजेश (बाळा) काशीवार यांनी काँग्रेसचे सेवक वाघाये यांचा २५ हजार ४८९ मतांनी पराभव करीत पुन्हा एकदा साकोली विधानसभेवर भाजपाचा झेंडा रोवला.

BJP's child Kashywar won | भाजपचे बाळा काशीवार विजयी

भाजपचे बाळा काशीवार विजयी

साकोली : साकोली विधानसभेच्या मतमोजणीत भाजपचे राजेश (बाळा) काशीवार यांनी काँग्रेसचे सेवक वाघाये यांचा २५ हजार ४८९ मतांनी पराभव करीत पुन्हा एकदा साकोली विधानसभेवर भाजपाचा झेंडा रोवला.
साकोली विधानसभेसाठी यावेळी २१ उमेदवार रिंगणात होते. दि. १५ ला मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. यात भाजपचे राजेश ८० हजार ९०२, शिवसेनाचे डॉ.प्रशांत पडोळे २ हजार १५१, राष्ट्रवादीचे सुनील फुंडे १९ हजार ८८८, बसपाचे डॉ. महेंद्र गणवीर ३१ हजार ६४९, काँग्रेसचे सेवक वाघाये ५५ हजार ४१३, अचल मेश्राम ६९५, अ‍ॅड. व्यंकटराव बोरकर ५३७, डॉ.अजय तुमसरे ११ हजार ८६४, रमेश खेडीकर २६२, किशोर खेडीकर १८८, तुळशीराम गायधने ६५७, रामकृष्ण ठेंगडी ५०४, अ‍ॅड.धनंजय राजाभोज ३२२, के.एन. नान्हे ८६४, तु.रा. भुसारी २ हजार ३१६, स्वर्णलता माकोडे १ हजार १२९, ज्ञानेशकुमार लिचडे २,१०४, शेषराव गिऱ्हेपुंजे १ हजार ८०५, बिसन सयाम २,७८४, सुनिता हुमे १ हजार ३०२, प्रभू हटवार ८९५ मते मिळाली. यात भाजपाचे राजेश काशीवार हे २५, ४८९ मतांनी विजयी झाले.
आज सकाळपासूनच सेंदूरवाफा येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. यात सुरुवातीचे चार फेऱ्यात सेवक वाघाये हे समोर होते. मात्र पाचव्या फेरीनंतर भाजपाचे काशीवार हे समोर झाले. या चुरशीच्या लढतीत काशीवार अखेरपर्यंत समोरच राहिले. मतमोजणी केंद्राच्या बाहेर सकाळपासूनच कार्यकर्ते फटाके फोडत होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: BJP's child Kashywar won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.