शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:11 IST

केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देनाना पटोले यांची टीका : काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासन व तसेच भाजपप्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झालेला आहे. २ एप्रिल रोजी संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक दुर्दैर्वी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला. देशभरातील विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी परखड टीका काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली.सोमवारी सकाळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे भंडारा शहरात गांधी चौक येथे नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भारतीय अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ.नितिन राऊत, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे ,भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रदेश सचिव नितिन कुंभलकर, भंडारा निरीक्षक प्रफुल गुडगे पाटील, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, जि.प.सभापती प्रेमदास वणवे, रेखा वासनिक, महिला जिल्हा अध्यक्षा सीमा भुरे,पक्ष नेता शमीम शेख उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पश्चिम बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलीमागे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री अश्विन चौबे यांचे पुत्र अरिजित शाश्वत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे स्पष्ट झाले आणि त्याकरिता भाजपाशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता, असे स्पष्ट असताना भाजप सरकारतर्फे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे असा संघर्ष निर्माण करणे हा भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. दुदैर्वी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असतांना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे गणवीर यांनी सांगितले.संचालन अजय गडकरी यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडळाला भेट दिली. यावेळी अनिकजमा पटेल, धनराज साठवणे, जयश्री बोरकर, प्रसन्ना चकोले, भूषण टेंभूर्णे, अजय गडकरी, मुकुंद साखरकर होमराज कापगते, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, शंकर राऊत, अमर रगडे, विशाल तिरपुडे, सुनील गिहेपुंजे, प्रभू मोहतुरे, भूमेश्वर महावाडे, शिशिर वंजारी, विलास ढेंगे, दिपक गजभिये, भावना शेंडे, डॉ.विनोद भोयर, अवैश पटेल, सुनंदा बांते, श्रद्धा चाचीरे, अनिता नाग्फासे, सीमा भोंगाडे, आशा भोंगाडे, द्वारकानाथ भोंगाडे, जिवन भजनकर, पृथ्वी तांडेकर,मंगेश हुमणे, विष्णु रणदिवे, भाऊ कातोरे, मुन्ना समरीत, शिवलाल नागपुरे, अजीम खान, सुरेश गोतेफोडे, प्रमोद मानापुरे, कमल साठवणे,नितिन वासनिक, यश भगत, राजू सूर्यवंशी, धनंजय तिरपुडे, सुद्धमता नंदागवली ,नीलकंठ कायते, सरिता चौरागडे, हेमलता सार्वे, संदीप गायधने, आकाश काकडे, योगेश्वर रोकडे, इम्रान पटेल, मोईस कुरेशी, नाहेद परवेज, मेहमूद खान, नीरज गौर, प्रवीण भोंदे, हिरामण लांजेवार, अंकुश बंकर, किशोर जन्भांधू, रिजवान काजी, प्रदीप बुराडे, ध्यानेश्वर रहांगडाले, राजू वंजारी, स्वाती निमजे, प्रिया खंदारे, निर्मला कापगते, सुनिता कापगते, जागेश्वर बडगे, प्रदीप वाडीभस्मे, अनिल किरणापुरे, श्याम शिवणकर आदी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.