बालमहोत्सवाची जय्यत तयारी
By Admin | Updated: January 24, 2016 00:42 IST2016-01-24T00:42:38+5:302016-01-24T00:42:38+5:30
लोकमत बाल विकास मंचतर्फे २४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील राजीव गांधी चौक स्थित भंडारा पॅरामेडीकल कॉलेजचा सांस्कृतिक सभागृहात...

बालमहोत्सवाची जय्यत तयारी
आॅडीशन आज : विविध स्पर्धांचे आयोजन
भंडारा : लोकमत बाल विकास मंचतर्फे २४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील राजीव गांधी चौक स्थित भंडारा पॅरामेडीकल कॉलेजचा सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय आंतरशालेय बालमहोत्सवाच्या प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरला होणाऱ्या जिल्हास्तरीय महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.
जिल्ह्यातील बालविकास मंच सदस्य प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात.
महोत्सवात वर्षे ५ ते १५ वयोगटातून एकल नृत्य, एकपात्री अभिनव (बेस्ट ड्रामेबाज), एकापेक्षा एक (टॅलेन्ट हन्ट) व उत्कृष्ठ निवेदक (बेस्ट एन्कर) स्पर्धेकरिता प्राथमिक निवळ फेरी घेण्यात येईल. इच्छूक स्पर्धकांनी कार्यक्रम स्थळी वेळेवर येणे अनिवार्य आहे. हजेरीच्या क्रमानुसार सादरीकरणाची संधी देण्यात येईल.
प्राथमिक फेरीकरिता नृत्यगीत पेनड्राईव्हमध्ये आणणे आवश्यक आहे. सदस्य नोंदणी कार्डशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजक ललित घाटबांधे ९०९६०१७६७७, ९४२१०७१००१ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)