दुचाकीची चारचाकीला धडक

By Admin | Updated: March 26, 2015 00:25 IST2015-03-26T00:25:31+5:302015-03-26T00:25:31+5:30

एका दुचाकीस्वाराने मागून चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली.

Bike Fourchild | दुचाकीची चारचाकीला धडक

दुचाकीची चारचाकीला धडक

तुमसर : एका दुचाकीस्वाराने मागून चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास तुमसर देव्हाडी मार्गावरील गणेश लॉन्स समोर घडला. जखमींची नावे सुभाष देवडे (४५), योगेश बुचे (३५) दोघेही रा.तुमसर अशी आहेत.
सुभाष देवडे व योगेश बुचे दुचाकीने तुमसरकडे जात होते. त्यांच्यासमोर चारचाकी वाहन होते. दुचाकी वाहन अनियंत्रित होऊन चारचाकी वाहनावर धडकली. यात दुचाकीस्वार सुभाष व योगेश गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व हाताला जबर मार बसला. नागरिकांनी जखमींना तात्काळ स्थानिक सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहे.
तुमसर देव्हाडी मार्गावर वाहतूक आहे. हा रस्ता अरुंद असून त्याला रुंद करण्याची गरज आहे. पाच कि.मी. च्या रस्त्यावर पुुन्हा खड्डे पडणे सुरु झाले आसहे. या रस्त्याची मालकी जिल्हा परिषदेकडे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bike Fourchild

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.