दुचाकींची धडक
By Admin | Updated: August 22, 2015 00:52 IST2015-08-22T00:52:49+5:302015-08-22T00:52:49+5:30
भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री अड्याळ-चिखली मार्गावर घडली.

दुचाकींची धडक
तीन जखमी : चिखली मार्गावरील घटना
अड्याळ : भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले. ही घटना गुरूवारी रात्री अड्याळ-चिखली मार्गावर घडली.
हरी तुळशीराम कुळमते (५०) रा. सायगांव (किटाळी), जोगेंद्र देवीदास रामटेके (२५) व सचिन जयदेव रामटेके (२८) रा. उमरी असे जखमींचे नाव आहे. हरी हा एव्हीएच ६५५४ दुचाकीने अड्याळ येथून सायगावकडे तर जोगेंद्र व सचिन हे एमएच ४० जी ३५२६ या दुचाकीने उमरी येथून अड्याळकडे येत होते. दरम्यान चिखली मार्गावर दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक बसली. यात दोन्ही वाहनावरचे तिन्ही गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत तिघेही रस्त्यावर विव्हळत पडले असताना तेथून अनेक वाहने गेलीत. मात्र, त्यांना कोणीही मदतीचा हात दिला नाही. दरम्यान किटाळी येथून अड्याळकडे येणाऱ्या भंडारा आगाराच्या बस क्रमांक एमएच ४० एन ८४९१ च्या चालकाने गंभीर जखमींना अड्याळ ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. तिघांचीही प्रकृती अत्यवस्थ असल्याने भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अड्याळ पोलीस तपास करीत आहे. (वार्ताहर)