Bhandara News ( Marathi News ) : भंडारा जिल्ह्यातील भाजपा नेत्या माहेश्वरी नेवारे यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व पद रद्द झाले आहे. माहेश्वरी नेवारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी रद्द केले होते. या आदेशाविरोधात नेवारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. यावर आता भंडारा जिल्हा अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला आहे. माहेश्वरी नेवारे यांचे जिल्हा परिषद सदस्य पद रद्द करण्यात आले आहे.
“मनोज जरांगे पाटलांनी सरकारशी संवाद साधण्याची गरज, काही गैरसमज असतील तर...”: उदय सामंत
भंडारा जिल्ह्यात भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. भाजपाकडून माहेश्वरी नेवारे या प्रबळ दावेदार होत्या. पण, आता त्यांचे सदस्यत्वपद रद्द झाल्यामुळे त्यांना निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. यामुळे आता काँग्रेसचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. याआधीच आज भाजपाला मोठा धक्का बसला आहे. माहेश्वरे नेवारे यांचे सदस्यत्वपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे. याआधी विभागीय आयुक्त यांनी सदस्यस्वपद रद्द ठरवले होते.
माहेश्वरी नेवारे या साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी जिल्हा परिषद गावातून त्या अनुसूचित जमातीच्या आऱक्षित जागेवरुन निवडून आल्या आहेत. नेवारे या गोंडगोवारी या जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत. माहेश्वरी नेवारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र १४ जानेवारी रोजी गोंदिया जात पडताळणी समितीने रद्द केले आहे.
जात वैधता पडताळणी समितीच्या विरोधात नेवारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यात नेवारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांचा सदस्यत्व ही रद्द केले होते.