कवलेवाडा येथे हायमास्ट दिव्यांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:41+5:302021-04-08T04:35:41+5:30
भंडारा : कोका वन्यजीव अभयारण्यांतर्गत असलेल्या कवलेवाडा येथे वन्यप्राणी व इतर विषारी जीवजंतूंपासून मानव आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण व्हावे, ...

कवलेवाडा येथे हायमास्ट दिव्यांचे भूमिपूजन
भंडारा : कोका वन्यजीव अभयारण्यांतर्गत असलेल्या कवलेवाडा येथे वन्यप्राणी व इतर विषारी जीवजंतूंपासून मानव आणि पाळीव प्राण्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. या हायमास्ट दिवे बसविणे कामाचे भूमिपूजन सरपंच धनराज शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र प्रतिष्ठानतर्फे हायमास्ट दिवे बसविण्यासाठी निधी पुरविण्यात आला. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक रामानुजन तथा उपसंचालक पूनम पाटे, सहाय्यक वनसंरक्षक रुपाली भिंगारे - सावंत यांच्या प्रयत्नाने हा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला पोलीस पाटील भागवत बोंदरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन जाधव, वनपाल सुमेध ठाकरे, वनरक्षक राहुल लखवाल आदी उपस्थित होते.