महिलेवर अत्याचार करणार्या भोंदुबाबाला कारावास
By Admin | Updated: May 19, 2014 23:13 IST2014-05-19T23:13:55+5:302014-05-19T23:13:55+5:30
आजाराने त्रस्त असलेल्या पिडीत महिलेवर अत्याचार करणार्या भोंदूबाबा प्रभाकर मस्के याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास व

महिलेवर अत्याचार करणार्या भोंदुबाबाला कारावास
भंडारा : आजाराने त्रस्त असलेल्या पिडीत महिलेवर अत्याचार करणार्या भोंदूबाबा प्रभाकर मस्के याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. लाखांदूर पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या किरमटी येथील भोंदूबाबा प्रभाकर मस्के यांच्या अंगात वित्तूबाबा येत असल्याचा समज अनेकांमध्ये होता. ब्रम्हपूरी येथील सर्वसाधारण कुटूंबातील एक महिला आजाराने त्रस्त होती. उपचार करूनही आजार बरा होत नसल्याने पिडीत महिलेला घराजवळील एका महिलेने भोंदूबाबाकडे जाण्यास सांगितले. उपचार बरा होईल, या आशेने गेले असता, भोंदूबाबाने सदर महिलेवर पिंपळगाव (कोहळी) येथील सहकार्याच्या घरी बलात्कार केला. यावेळी पिडीत महिलेच्या पतीस व सहकारी लवा उर्फ लक्ष्मण शहारे याला दुर्गादेवीच्या मंदीरात नारळ फोडण्यासाठी पाठविले होते. घरी गेल्यानंतर पिडीत महिलेने पतीला झालेली घटना सांगितल्यावर भोंदूबाबाचे घर गाठून लाखांदूर पोलिसांच्या स्वाधीन केले. लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. भंडारा जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी सदर भोंदूबाबाला दोन वर्षांचा कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या भोंदुबाबाचा सहकारी लक्ष्मण शहारे याच्या विरूद्ध पुरावा उपलब्ध न झाल्याने बंदपत्राच्या आधारे त्याला सोडून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)