रासेयो जिल्हा समन्वयकपदी भोजराज श्रीरामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:41 IST2021-09-24T04:41:17+5:302021-09-24T04:41:17+5:30

भंडारा : कुलगुरू व अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या निर्देशानुसार जे. एम. ...

Bhojraj Shriram as Raseyo District Coordinator | रासेयो जिल्हा समन्वयकपदी भोजराज श्रीरामे

रासेयो जिल्हा समन्वयकपदी भोजराज श्रीरामे

भंडारा : कुलगुरू व अध्यक्ष राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या निर्देशानुसार जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भंडारा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे यांची भंडारा जिल्ह्यातील रासेयो संलग्नित महाविद्यालयाकरिता भंडारा जिल्हा समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. भोजराज श्रीरामे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगर परिषद, पोलीस, रस्ते सुरक्षा विभाग, निवडणूक आयोग, नेहरू युवा केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन व इतर सामाजिक संस्थांसोबत उपक्रमांचे आयोजन महाविद्यालय व आंतरमहाविद्यालयीन स्तरावर केले. कोरोना महामारीच्या कालावधीत कोविड -१९ चा प्रसार व प्रतिबंधक जनजागृती मोहीम, मास्क, सॅनिटायझर, किराणा किट वाटप, लसीकरण जनजागृती इत्यादी कार्यक्रम त्यांनी राबविले आहेत.

Web Title: Bhojraj Shriram as Raseyo District Coordinator