कहार समाजाचा भुजली मेळावा
By Admin | Updated: August 12, 2014 23:37 IST2014-08-12T23:37:01+5:302014-08-12T23:37:01+5:30
रक्षाबंधनाचे औचित्य साधून कहार समाज बांधव व मासेमारी सहकारी संस्थेच्या विद्यमाने भुजली मेळावा व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो समाज बांधवांनी शहरातील

कहार समाजाचा भुजली मेळावा
भंडारा : रक्षाबंधनाचे औचित्य साधून कहार समाज बांधव व मासेमारी सहकारी संस्थेच्या विद्यमाने भुजली मेळावा व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो समाज बांधवांनी शहरातील मुख्य मार्गाने ही शोभायात्रा काढली.
कहार समाजात रक्षाबंधनाच्या दिवशी भुजली मेळाव्याचे अनन्य साधारण महत्व आहे. या मेळाव्यात समाज बांधव उत्साहाने सहकुटूंब सहभागी होतात. मासेमारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष कंसलाल चंदनबटवे, सचिव गजानन बादशहा, उपाध्यक्ष घनश्याम बरबरैय्या, घनश्याम पंडेल, अशोक चंदनबटवे, मंगल चंदनबटवे, अशोक बरबरैय्या, सुनिल पचारे, ईसुनाथ भारद्वाज यांच्या नेतृत्वात कहार समाज बांधव व भगिनींनी भुजलीसह नेहरू वॉर्ड मेंढा येथून शोभायात्रा काढली. ही शोभायात्रा गांधी चौकमार्गे मेंढा तलाव परिसरात विसर्जीत करण्यात आली. शोभायात्रेतील घोडे आकर्षणाचे केंद्र ठरले होते. कहार समाज बांधवांचा हा उत्सव पार पडल्यानंतर समाज बांधवांनी भुजली देऊन ज्येष्ठांचे आर्शिवाद घेतले. सामूहिक भोजनााने सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी राजकुमार बर्वे, नरेश बरबरैय्या, निलेश बादशहा, दिपक चंदनबटवे, दिनेश बरबरैय्या, गोलू दुधबर्वे, रवि भवरीया आदींनी सहकार्य केले. शोभायात्रेचे संचालन टिकाराम चंदनबटवे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)