शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

भरधाव ट्रक पुलावरुन कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांग दिसून आली. पोलिसांना वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सदर पुलावर गतवर्षीही एका दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेने हा अपघात घडला होता. महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देचालक ठार : राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव वेगाने असलेला ट्रक पुलावरुन खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. मयुर अशोक भडके (३७) रा. टेकानाका नागपूर असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास राष्टÑीय महामार्गावरील भिलेवाडा पुलावर घडली.लाखनीहून भंडाराकडे सिमेंट काँक्रीटचे साहित्य घेवून येत असलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटले. सदर ट्रक पुलाचे कठडे तोडून थेट २७ फूट खोल नाल्यात कोसळला. यात ट्रकचा भार व साहित्यामुळे दर्शनी भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. पुलाचे कठडे तुटल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारधा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहायाने ट्रकच्या दर्शनी भाग वर करुन ट्रक चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. प्रयत्नानंतर कॅबीनमध्ये फसलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले. चालकाना बाहेर काढण्यापर्यंत तो जिवंत होता. मात्र रुग्णालयात घेवून जात असताना त्याची प्राणज्योत मालविली.अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांग दिसून आली. पोलिसांना वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सदर पुलावर गतवर्षीही एका दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेने हा अपघात घडला होता. महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.सन २०१० मध्ये देवरी ते शिंगोरीपर्यंतच्या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात आले. मात्र शिंगोरी ते बेलापर्यंतचा महामार्गाचे विस्तारीकरण झाले नाही. गत दशक भरात अनेक निरपराध नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे.बायपास महामार्ग बांधकामाला मंजूरी मिळाली असली तरी बांधकाम व्हायला बराच कालावधी लागणार आहे. महामार्ग अरुंद असल्याने व रहदारीची प्रमाण मोठे असल्याने सातत्याने अपघात घडत असतात. रविवारी रात्रीच्या सुमारास घडलेला अपघातही त्याच स्वरुपात आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.१५ फूट पुलावरुन कार कोसळली नाल्यातमोहाडी : पुलाचे कठडे तोडून कार पंधरा फुट खोल नाल्यात कोसळल्याची घटना मोहाडी-वरठी मार्गावर सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. दैव बलवत्तर म्हणून चालकाला साधे खरचटलेही नाही. मोहाडीहून वरठीकडे जात असलेली कार क्रमांक एम एच ३७ जी ५७३४ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरुन ही कार पंधरा फुट खोल नाल्यात कोसळली. यात सुदैवाने चालक सचिन वसंता माटे बचावले. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Accidentअपघात