शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

‘मे’ हीटच्या तडाख्याने भंडारावासी बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:09 PM

यंदाचा उन्हाळा भंडारेकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, भंडाराचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाºया उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देउन्हाच्या झळा तीव्र : शहरात पारा ४६ अंशांवर, उकाड्याने नागरिक त्रस्त

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदाचा उन्हाळा भंडारेकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, भंडाराचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाºया उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दिवसभर उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे दुपारी शहरातील रस्ते ओस पडले आहेत. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे तर दुसरीकडे महावितरणनेही विजेचा लंपडाव केल्याने भंडारेकर हैराण झाले आहेत.यंदा हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदाचा उन्हाळा तीव्र असून, दिवसेंदिवस तापणाºया उन्हांमुळे शहरामध्ये राहणे अनेकांना नकोसे झाले आहे. पाºयाने शुक्रवारला ४५.५ अंश तापमान गाठले होते. अजून मे महिन्यातील दोन आठवडे शिल्लक आहे. त्यामुळे अजून परिस्थिती बिकट होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे अजून दोन आठवडे उन्हाची तीव्रता जाणवणार आहे. जबरदस्त उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.नवतपा २५ मे पासूनभंडारा-गोंदिया पोटनिवडणुक प्रचाराला वेग आला असला तरी प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास हा वेग मंदावल्याचे दिसून येते. २५ मे पासून नवतपाला सुरूवात होणार आहे. मात्र राजकीय आखाड्यात चार दिवसापुर्वीपासूनच नवतपाला प्रारंभ झालेला आहे. नवतपामध्ये असणारी उष्णतेची दाहकता शनिवारला दिसून आली. घराबाहेर जावे तर उन्हाच्या झळा, घरात थांबावे तरी घामाच्या धारा, कूलरने दिलासा मिळेना अन् उष्णतेच्या तडाख्यामुळे क्षणभर चैन पडेना ! यावर्षी मार्चपासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या. मे महिन्यात असह्य केलेल्या उन्हाच्या झळा बसत आहे. अगदी सकाळपासूनच उकाडा वाढू लागला. दुपारी दोनच्या सुमारास तर भट्टीजवळून चालतोय की काय? असा अनुभव येत आहे. शनिवारला यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस ४३ अंश तापमान नोंदविण्यात आले. अंगाची लाहीलाही करणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत ऊष्ण वारे वाहत आहेत.