कृषी केंद्रावर भरारी पथकाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:26+5:30

चढ्या दराने कुठेही विक्री होणार नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने पथके नेमण्यात आले असून या पथकांची कृषी केंद्रावर करडी नजर राहणार आहे. शेतकऱ्यांना काही समस्या असतील तर पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.

Bharari squad's keen eye on the agricultural center | कृषी केंद्रावर भरारी पथकाची करडी नजर

कृषी केंद्रावर भरारी पथकाची करडी नजर

ठळक मुद्देअचानक भेटीने दुकानदारांमध्ये धास्ती : खते बियाणे बांधावर उपलब्ध करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बी-बियाणे उपलब्ध व्हावे, चढ्या दराने कुठेही विक्री होणार नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने पथके नेमण्यात आले असून या पथकांची कृषी केंद्रावर करडी नजर राहणार आहे. शेतकऱ्यांना काही समस्या असतील तर पथकाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे.
भंडारा तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कृषी विभागाच्या पथकाचे प्रमुख जिल्हा गुणनियंत्रक मस्कर, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, पंचायत समितीचे कृषी अधिकारी चौधरी यांचा समावेश आहे.
भंडारा तालुक्यातील कृषी औषध विक्रेते वितरक यांच्या केंद्रांना अचानक भेटी दिल्या जात आहे. यावेळी अधिकाऱ्यांमार्फत दुकानातील साठा तपासणी, अधिसूचित नसलेले बियाणे, खते तसेच दुकानातील विक्री केलेल्या खते बियाण्यांचा हिशोब न जुळने आदी कारणांमुळे पथक कारवाई करणार आहे. यावेळी केंद्र धारकांना गटामार्फतच खते बियाणे विक्री करणे बंधनकारक असल्याचे तंत्र अधिकारी गायधने यांनी सांिगतले. कृषी केंद्रानी गटामार्फत थेट बांधावर बियाणे पोहोचविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदीची बिले घ्यावी, काही अडचणी उद्भवल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन अविनाश कोटांगले यांनी केले आहे.

Web Title: Bharari squad's keen eye on the agricultural center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.