भंडारा शहरात होणार भूमिगत गटारे!
By Admin | Updated: March 27, 2015 00:23 IST2015-03-27T00:23:11+5:302015-03-27T00:23:11+5:30
दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात भुमिगत गटारे (अंडर ड्रॅनेज सिस्टएम) बांधण्याची योजना नगर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.

भंडारा शहरात होणार भूमिगत गटारे!
इंद्रपाल कटकवार भंडारा
दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात भुमिगत गटारे (अंडर ड्रॅनेज सिस्टएम) बांधण्याची योजना नगर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना व भुमिगत गटारे बांधण्यासंदर्भातला प्रस्ताव पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला केंद्राची अंतरीम मान्यता मिळाल्यास शहरात या बांधकामांना प्रारंभ करता येणार आहे. प्राथमिक स्वरूपात या योजनेवर ज;यपास १५० कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
सन १९८४ च्या नियमातर्गत शहरात प्रतिव्यक्ती प्रतिदिन ७० लीटर पाण्याची गरज आहे. मात्र या उदिष्ठाची प्रतिपूर्ती मुलधूत सुविधांअभावी सध्या होत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या धोरणानुसार ‘अंडरग्राऊंड ड्रॅनेज सिस्टम’ योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रतिव्यक्ती प्रतिदिन १३५ लीटर पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. या आशयाअंतर्गत भंडारा शहराची व्याप्ती व स्वरूप पाहता आगामी काळात शहरात भुमिगत गटारे योजना कार्यान्वित करणे महत्वाचे आहे. त्यामुळे नदीत उपलब्ध असलेले पाणी व नागरिकांची गरज यावर अभ्यास करून भंडारा नगर पालिका प्रशासनाने जुन्या प्रस्तावात बदल करण्याचे ठरविले. यात शहरात १६८ किलोमीटर पाण्याची जलवाहिनी घालणे, एक जलशुद्धीकरण सयंत्र बसविणे यासह अनेक लहानमोठ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु १३५ लीटर पाण्याची उपयोगिता झाल्यावरच भुमिगत गटारे योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेचा समावेश आता ‘अर्बन इन्फ्रॉस्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार स्मॉल अॅण्ड मिडीयम टाऊन’ मध्ये करण्यात आला आहे. परिणामी या दोन्ही योजनेचा खर्च १५० जाण्याची शक्यता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या आशयाच्या प्रस्तावाला अंतिम रुप देण्याचे काम सुरु असून तो प्रस्ताव मार्च अखेर संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाल्यास शहराच्या विकासकामाला गती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळा तोंडावर आहे. नदीत भरपूर पाणी असतानाही भंडारेकरांना दोन वेळा नाही किमान एकवेळा तरी भरपूर पाणी मिळेल, अशी व्यवस्था तरी पाणीपुरवठा विभागाकडे नाही.