शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

भंडारा जिल्हा परिषद ‘जनपद’वर राज्य निर्मितीच्या ५६ वर्षांनंतरही फेरफार नाही

By admin | Updated: January 19, 2016 00:21 IST

मध्य प्रदेशात असलेल्या महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती करण्यात आली.

शहरातील शासकीय जागांवर एमपीचा ताबा!प्रशांत देसाई भंडारामध्य प्रदेशात असलेल्या महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य म्हणून निर्मिती करण्यात आली. याला ५६ वर्षांचा कालावधी लोटला असून येथील शासकीय रेकॉर्डवर अजूनही मध्यप्रदेशातील अस्तित्व आढळून येत आहे. शहरातील जिल्हा परिषदसह अन्य शासकीय जागांच्या कागदपत्रांचे फेरफार झाले नसल्याने आखीवपत्रीका व ७/१२ वर जनपदची नोंद आहे.भारतातील मध्यराज्य म्हणून मध्यप्रदेशाची ओळख आहे. इंग्रज राजवटीपासून सीपी अ‍ॅन्ड बेरारचे राज्य म्हणून मध्यप्रदेशची ओळख होती. मध्यप्रदेशात महाराष्ट्राचा समावेश होता. दरम्यान इंग्रजांनी शासकीय जागा किंवा कार्यालयांना ‘जनपद’ असे विशेषनात्मक नामोल्लेख केला होता. तो नामोल्लेख पुर्वापार आजही चालू असल्याचे निदर्शनात येते.क्षेत्रफळाच्या दृष्टिने अवाढव्य असलेल्या मध्यप्रदेशचे १ मे १९६० मध्ये विभाजन करून महाराष्ट्रला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. राज्याची निर्मिती होवून आता ५६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, इंग्रज किंवा मध्यप्रदेश सरकारने ठेवलेले हे नाव आजही जसेच्या तसे शासकीय कागदपत्रांवर वापरण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्र स्वतंत्र झाला असला तरी, भंडारा येथील शासकीय कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या तीन मोक्याच्या जागांचे फेरफार झाले नसल्याने त्यांच्या आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद व पी. डब्ल्यू. डी व्यवस्थापनाखाली अशी नोंद आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १०० मधील तरतुदीनुसार जनपदकालीन इमारती (जागा) या जिल्हा परिषदला हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदच्या अधिपत्याखाली असलेल्या जागेच्या नझुल आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद व सरकारी पट्टेदार व पी. डब्ल्यू. डी च्या व्यवस्थापनाखाली राहील अशी नोंद करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदसह तीन जागाराष्ट्रीय महामार्गावरील नविन जिल्हा परिषद इमारत, जूनी जिल्हा परिषद इमारत, व माजी शासकीय मनरो हायस्कूल व सध्याचे लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय या अत्यंत महत्त्वाच्या जागा आहेत. या जागांच्या नझुल आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद सभा व पी.डब्ल्यू.डी. व्यवस्थापनाखाली अशी नोंद आहे.जिल्हाधिकाऱ्यांना घातले साकडेराज्यची निर्मिती होवून ५६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. आजपर्यंत आखीवपत्रिका किंवा ७/१२ वरील जनपद नोंदीची फेरफार घेण्याबाबत अधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत ठरली. त्यामुळे जि.प.ची इमारत आजही मध्यप्रदेशच्या जनपदवर उभी आहे. कागदपत्रांवरील दुरूस्ती करण्याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या पुढाकारातून मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्याकडे पत्रव्यवहार करून साकडे घातले आहे.जिल्हा परिषद, मनरो शाळा व जिल्हा परिषद जूनी इमारत या शासकीय जागांच्या आखीवपत्रिका व ७/१२ वर जनपद असे नमुद आहे. जिल्हा परिषद अधिनस्थ जागेवर जनपद ऐवजी जिल्हा परिषद अशी नोंद करून सुधारणा करावी, अशा मागणीचा ठराव सभागृहात पारित करण्यात आला आहे.-राजेश डोंगरेउपाध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा.