‘भंडाऱ्याचा राजां’च्या दरबारी नावीन्यपूर्ण उपक्रम

By Admin | Updated: September 22, 2015 00:49 IST2015-09-22T00:49:12+5:302015-09-22T00:49:12+5:30

भारतीय संस्कृती विविध नाविण्यपूर्ण उपक्रम तथा परंपरेने परिपूर्ण आहे. आजच्या घडीला बंधूभाव, सामाजिक बांधीलकी

'Bhandara kings' court innovation initiative | ‘भंडाऱ्याचा राजां’च्या दरबारी नावीन्यपूर्ण उपक्रम

‘भंडाऱ्याचा राजां’च्या दरबारी नावीन्यपूर्ण उपक्रम

भंडारा : भारतीय संस्कृती विविध नाविण्यपूर्ण उपक्रम तथा परंपरेने परिपूर्ण आहे. आजच्या घडीला बंधूभाव, सामाजिक बांधीलकी क्वचितच पहायला मिळेल. बंधूभावाचे उत्कृष्ट उदाहरण भंडाऱ्यातील एका गणेशोत्सव मंडळाने मागील एक दशकापासून सादर केले आहे. न्यू ज्युनिअर गणेशोत्सव मंडळ शहीद वॉर्ड भंडारा असे या मंडळाचे नाव आहे. ‘भंडाराचा राजा’ अशी उपाधी मिळालेल्या या मंडळातर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
मदतीच्या ओघातून भंडाऱ्याचा राजा मानवी अंतर्मनात वसल्याने भंडाऱ्याचा राजा हा शहराची शान बनला आहे. ११ वर्षांचा कार्यकाळ या मंडळाला लोटला असून गणेशोत्सवाच्या रुपातून त्याचे वेगळे रुप आज सर्वजण पाहत आहेत. सामाजिक उपक्रमात सदैव आघाडीत राहणाऱ्या भंडाऱ्याचा राजा या मंडळाने रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, दुर्बल घटकांना आर्थिक मदत, वृक्षारोपण, निसर्गसंवर्धन, वेशभूषा आदी विविध उपक्रम राबवून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बालवयात मातृपितृ छत्र हरविलेल्या बहिण भावंडांना आर्थिक मदत देऊन त्यांना जगण्याचे बळ देण्याचे आदर्श कार्य या मंडळाने केले आहे.
याशिवाय तरुणांचे प्रेरणास्त्रोत असलेले शहीद भगतसिंग यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पोळा उत्सवही या मंडळातर्फे भरविला जातो. १५० सदस्यीय या मंडळात प्रत्येक जण भक्तीभावाने काम करतो. लहान्यापासून मोठ्यांपर्यंत भंडाऱ्याचा राजा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. देखणे रुप, भव्य आकार, उत्कृष्ट साजसज्जा हे येथील गणपतीचे आकर्षण आहे. विविध देखाव्यांच्या माध्यमातून जनप्रबोधनाचे कार्यही या मंडळातर्फे सुरु आहे. सन २०१३ मध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांचे रुप देखाव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आले होते. तसेच सन २०१४ मध्ये गुजरात येथील भूज मंदिराचा देखावा, भ्रष्टाचारावर आधारित प्रतिकृती व यावर्षी श्री साईबाबा यांचे रेखाटलेली हुबेहुब प्रतिकृती सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती. यावेळी ‘श्रीं’ची आकर्षक व तेवढीच रूबाबदार मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.एका भाविकाने चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. (प्रतिनिधी)

भंडारा भूषण पुरस्कार
४दरवर्षी विविध उपक्रम राबविणाऱ्या न्यू ज्युनिअर गणेशोत्सव मंडळाने या वर्षापासून भंडारा भूषण पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. २६ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार असून पुरस्कूत होणाऱ्याला ११ हजार रूपये रोख, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येईल. २७ रोजी रक्तदान शिबिर असल्याचे मंडळाचे विश्वस्त मंगेश वंजारी यांनी सांगितले.

Web Title: 'Bhandara kings' court innovation initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.