शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

भंडारा : पाणी टंचाईग्रस्त ३४० गावांत होणार सव्वा तीन कोटींचा खर्च !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 3:44 PM

जिल्ह्यात ४७२ कामे : जिल्हा प्रशासनाचा प्रस्तावित आराखडा

देवानंद नंदेश्वर

भंडारा : उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून पिण्याच्या पाण्याची अनेक गावात मार्च महिन्यांपासून टंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी यंदा कृती आराखडा तयार झालेला असला तरी प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही. ३४० गावांत ४७२ कामे होणार असून त्यावर ३ कोटी २३ लाख ५६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यावर्षी अल्प पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला असून त्यांची पातळी निम्म्यावर आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. केंद्र सरकारच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या मागणीनुसार उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढील सहा ते सात महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. जिल्ह्यात संभाव्य स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील ३४० गावांमध्ये या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रत्यक्षरित्या झाली नसल्याचे दिसत आहे. भंडारा जलसंकट निर्माण होते. भंडारा तालुक्याला वैनगंगा नदी वेढा घालून जाते. परंतु नदी काठावरील काही गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागते. जिल्हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. परंतु शहरातील काही वसाहतींमध्ये टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागतो. 

जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्जएप्रिल ते जून २०२४ पर्यंत पाणी टंचाईचा प्रस्तावित कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला. यात नळयोजना दुरुस्तीची ३५ कामे खर्च ७० लाख, विंधन विहिरी ११७ कामे खर्च १७५.५०, कुपनलिकांची ७ कामे खर्च ११ लाख ९० हजार, विंधन विहिर दुरुस्ती २५६ कामे खर्च ४० लाख ९० हजार, सार्वजनिक विहिरींचे खोदकाम ५३ कामे खर्च २१ लाख २० हजार, खासगी विहिर अधिग्रहण संख्या चार खर्च लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यात विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः विधन विहिरींची संख्या वाढविणे तसेच त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात येणार आहे. 

खर्चाचे अंदाजपत्रक वाढले२०२२-२०२३ मध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत १४० उपाययोजनांवर ८४ लाख २७ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला होता. यात भंडारा २५, साकोली २६, लाखनी १४, मोहाडी २०, तुमसर २६. पवनी १४, लाखांदूर ९ अशा तालुकानिहाय गावांचा समावेश होता. दरम्यान यंदा पर्जन्यमानातील घट व जलसाठ्यातील टंचाईमुळे उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपाययोजनांसाठीच्या खर्चात वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी