भंडारा-गोंदियाला मिळाले प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST2021-04-18T05:00:00+5:302021-04-18T05:00:49+5:30

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री होत होती. हा प्रकार खासदार पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली.  रुग्णांना इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, जुबलीयंट कंपनीनेसुध्दा इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Bhandara-Gondia got one thousand remedies each | भंडारा-गोंदियाला मिळाले प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर

भंडारा-गोंदियाला मिळाले प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेलांनी पाळला दिलेला शब्द : कॅडिला कंपनीच्या संचालकांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा व गाेंदिया या दोन्ही जिल्ह्यांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन शनिवारी उपलब्ध करून देण्यात आले. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला शब्द पाळला.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा गत काही दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. काळ्या बाजारात चढ्या दराने त्याची विक्री होत होती. हा प्रकार खासदार पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपाययोजना केली. 
रुग्णांना इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असून, जुबलीयंट कंपनीनेसुध्दा इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सन फार्माने चार रुग्णालयांना ४०० इंजेक्शनचा पुरवठा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर केला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. 
परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हीच बाब लक्षात घेत खासदार पटेल यांनी कॅडिला कंपनीच्या मालकांशी चर्चा करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे माजी आमदार राजेंद्र जैन यांनीसुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब खासदार पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती. दोन्ही जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर खासदार पटेल यांचे लक्ष असून, ते याचा सातत्याने आढावा घेऊन आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. 

निर्धारित दरानेच   होणार पुरवठा 
 भंडारा व गाेंदिया जिल्ह्यातील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांनासुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितले.

 

Web Title: Bhandara-Gondia got one thousand remedies each