शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जामंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 14:01 IST

शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

भंडारा : शासकीय जागेवर होत असलेले अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ऊर्जा मंत्री आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा शहर पाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन आणि कामगार कल्याण विभागाचा लाभ वाटप सोहळा दशहरा मैदानात शुक्रवारी (22 फेब्रुवारी) आयोजित होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सोहळा सुरू असताना भाजपाचे माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे अचानक मंचावर आले. पालकमंत्र्यांच्या समक्ष अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी त्याला पकडून व्यासपीठावरुन खाली आणले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार,  आठ दिवसापूर्वीच अरुण भेदेनं प्रशासनाला निवेदन देवून आत्मदहनाचा इशारा दिला होता. या घटनेने कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. 

टॅग्स :Suicideआत्महत्याBJPभाजपा