शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्हा ‘वेटिंग’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. नामांकनाला प्रारंभ झाला आहे. मात्र भाजपसह कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. सर्वांचे लक्ष विविध पक्षांच्या उमेदवारी घोषणांकडे लागले आहे. अशातच मंगळवारी भाजपने १२५ जणांची पहिली यादी घोषीत केली. मात्र या यादीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली यापैकी एकाही मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश नाही.

ठळक मुद्देउत्सुकता शिगेला : तीन पैकी एकाही मतदारसंघात उमेदवार घोषित नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १२५ जणांची पहिली यादी जाहीर केली. मात्र या यादीत भंडारा जिल्ह्यातील तीन पैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे इच्छूकांचा हिरमोड झाला असून उत्सूकता शिगेला पोहचली आहे. आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा असून कुणाला उमेदवारी मिळते यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे.विधानसभा निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे. नामांकनाला प्रारंभ झाला आहे. मात्र भाजपसह कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. सर्वांचे लक्ष विविध पक्षांच्या उमेदवारी घोषणांकडे लागले आहे. अशातच मंगळवारी भाजपने १२५ जणांची पहिली यादी घोषीत केली. मात्र या यादीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, साकोली यापैकी एकाही मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश नाही. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीसाठी काही महिन्यांपासून प्रयत्न करणाऱ्यांचा हिरमोड झाला. मात्र दुसºया यादीची प्रतीक्षा कायम आहे.युतीत जिल्ह्यातील तीनही जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत. तीनही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तीनही आमदार तिकीटासाठी इच्छूक असून त्यांनी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मात्र आता यापैकी कुणाची तिकीट कटणार आणि कुणाला मिळणार याची मोठी उत्सूकता आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांच्यासह नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, अरविंद भालाधरे इच्छूक आहेत. आता यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते की वेळेवर नवीनच नाव पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तुमसर विधानसभा मतदार संघातही उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच दिसत आहे. विद्यमान आमदार चरण वाघमारेसह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या नावाची चर्चा आहे. येथे कुणाला उमेदवारी मिळते यावर तर्कवितर्क लावले जात आहे. साकोली विधानसभा मतदार संघात भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. विद्यमान आमदार बाळा काशीवार यांच्यासह मिलिंद टिचकुले, प्रकाश बाळबुद्धे, भोजराज कापगते आणि अविनाश ब्राम्हणकर यांची नावे चर्चेत आहेत.मात्र पहिल्या यादीत कुणाचेही नाव आले नाही. त्यामुळे उत्सूकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसात उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.भंडारात काँग्रेस इच्छुक संभ्रमातआघाडीत भंडारा विधानसभा मतदारसंघ पीरिपाच्या कवाडे गटाला तिकीट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गत काही दिवसांपासून काँग्रेसच्या तिकीटासाठी आस लावून बसलेल्या इच्छूकांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. बाहेरील उमेदवाराला येथे उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा गट नाराज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे काही जण तर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्यापही आघाडीने या मतदारसंघाबाबत कोणताच निर्णय घेतला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा