सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा अव्वल

By Admin | Updated: June 22, 2015 00:21 IST2015-06-22T00:21:51+5:302015-06-22T00:21:51+5:30

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्य शासन दरवर्षी सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार देतात.

Bhandara district tops in cooperative sector | सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा अव्वल

सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा अव्वल

दुग्ध संघ सहकारभूषण : पाच संस्थांना मिळाला पुरस्कार
भंडारा : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्य शासन दरवर्षी सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार देतात. नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याने सर्वाधिक पाच पुरस्कार पटकावून मानाचा तुरा रोवला आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ भंडारा व पवनी येथील किसान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेला सहकारभूषण पुरस्कार तर भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था भंडारा, सिध्दार्थ बीडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था लाखनी व लक्ष्मी सहकारी धान गिरणी वाकेश्वर ता. भंडारा यांना सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याव्यतिरिक्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे. नागभीड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेला सहकारभूषण तर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Bhandara district tops in cooperative sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.