शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नवमतदार नोंदणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात उत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 10:06 PM

५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांची माहिती : २० हजार नवीन मतदार वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ५ जानेवारीनंतर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमात तीनही विधानसभा मतदारसंघात २०, ७१५ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. १६,२६० मतदार विविध कारणाने वगळण्यात आले असून यात ११ हजार ४६४ मृत मतदारांचा समावेश आहे. या विशेष कार्यक्रमानंतर जिल्ह्यात ९ लाख ९८ हजार ९४ इतकी मतदार संख्या झाली आहे. नवमतदार नोंदणीमध्ये राज्यात ज्या जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केलेले आहे त्यात भंडारा जिल्ह्याचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.१ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम त्यांनी यावेळी जाहीर केला. ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध मतदार यादीनुसार तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा मतदार संघातील १९९० मतदान केंद्रात एकूण ९ लाख ३९ हजार ६३९ मतदार होते. त्यानंतर घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ही संख्या ९ लाख ९८ हजार ९४ मतदार इतकी झाली. यात वाढलेले मतदार २० हजार ७१५ व वगळलेले मतदार १६ हजार २६० यांचा समावेश आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या विधानसभा मतदारसंघात १ जानेवारीला आधारित मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्राप्त झालेला असून कार्यक्रमाचे वेळापत्रक याप्रमाणे आहे.३ आॅक्टोबर २०१७ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, ३ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत मतदार यादीमधील संबंधित भागाचे, सेक्शनचे ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्लूए सोबत बैठक आणि नावाची खातरजमा करणे, ८ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबरपर्यंत विशेष मोहिम, ५ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे व ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.१ जानेवारी २०१८ रोजी ज्यांचे वय १८ वर्षांचे आहे अशा व्यक्तींनी नमुना ६, मतदार यादी नाव नोंदणीकरिता नमुना ७, मतदार यादीतील नाव वगळणीसाठी नमुना ८, मतदार यादीतील तपशिलात दुरुस्तीसाठी व नमुना ८ अ विधानसभा मतदार संघात पत्ता बदलासाठी तहसील कार्यालयात असलेल्या मतदार मदत केंद्रावर असलेल्या बिएलओकडे आवश्यक दस्ताऐवजा सह भरून द्यावा. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बुथ लेवल एजंट नेमावेत. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात सदर कार्यक्रमाचा फलक त्यांचे कार्यालयासमोर लावावा व या कार्यक्रमास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.