शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

भंडारा शहर स्वच्छतेत माघारले

By admin | Updated: May 7, 2017 00:16 IST

‘स्वच्छ भंडारा-सुंदर भंडारा’ असे ब्रीद असलेल्या भंडारा शहरात सद्यस्थितीत स्वच्छतेचा मागमूसही नाही.

स्पर्धेतच नाही तर नंबर कसला : भंडारा जिल्ह्यात केंद्रीय स्वच्छता चमू फिरकलीच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘स्वच्छ भंडारा-सुंदर भंडारा’ असे ब्रीद असलेल्या भंडारा शहरात सद्यस्थितीत स्वच्छतेचा मागमूसही नाही. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा शहराचा क्रमांक सोडा, यादीत साधे नावही नाही, ईतकी वाईट स्थिती या शहराची झालेली आहे.तत्कालीन राज्य सरकारने घनकचरा व्यवस्थापनासाठी वरठी मार्गावर पालिकेच्या मालकीच्या १३ एकर जागेत ‘डम्पिंग यार्ड’ उभारले. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ८५ लाख रूपयांचे अनुदान दिले होते. आता या ‘डम्पिंग यार्ड’मध्ये ना कचऱ्याचे व्यवस्थापन होत आहे, ना पालिकेला त्यापासून लाभ मिळत आहे. याऊलट याउलट ‘स्वच्छता’ या गोंडस नावाखाली ‘अहर्निश’ लुटण्याचे काम तत्कालीन सत्ताधाऱ्यांप्रमाणे विद्यमान सत्ताधाऱ्यांकडूनही सुरू आहे. ना वीजनिर्मिती ना खतनिर्मिती !शासनाच्या निधीतून त्याठिकाणी दोन स्वतंत्र इमारती बांधण्यात आल्या. दोन इमारतीच्या मधोमध बॉयोगॅस संयंत्र लावण्यात आले. तिथे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार होईल. ही बायोगॅस लगतच्या दुसऱ्या ईमारतीतीतून वीज निर्मिती करण्यात येईल. ही वीज शहरातील पथदिव्यांना पुरविण्यात येईल. याशिवाय या कचऱ्यापासून निरूपयोगी ठरणाऱ्या भुकटीपासून खत तयार होईल, असा या प्रकल्पाचा उद्देश होता. खत निर्मिती करून त्यातून मिळालेल्या उत्त्पन्नातून पालिकेला लोककल्याणकारी योजना राबविता येऊ शकल्या असत्या, परंतु तसे यापूर्वी झाले नाही, आता ही योजना अस्तित्त्वात येणार की नाही, याविषयी साशंकता आहे. नाल्या कचऱ्याने तुंबलेल्या शहरातील सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमध्ये प्लास्टिकचा कचरा अधिक प्रमाणात दिसून येत आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढिगारेही दिसून येत असून अनेक जण वापरात नसलेले प्लास्टिक थेट नाल्यात टाकून मोकळे होतात. रस्त्यावर टाकलेले प्लास्टिक उडून नाल्यांमध्ये अडकल्यानंतर सांडपाण्याचा प्रवाह थांबतो. हा कचरा वर्षानुवर्षे साचून राहत परिणामी, दुर्गंधी पसरते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शहरातील अनेक नाल्यांवर अद्यापही झाकणे बसविण्यात आलेली नाहीत. यामुळे ही समस्या आणखीच गडद होत आहे. कचराकुंड्यांजवळ प्लास्टिकचा कचरा पाहून मोकाट जनावरे अन्नाच्या शोधात उकिरड्यावर उच्छाद मांडतात. प्लास्टिकमध्ये अन्न शोधताना या जनावरांच्या पोटात ते प्लास्टिक जाण्याचा धोका नाकारता येत नाही.शहर स्वच्छतेसाठी प्रयत्नशीलभंडारा शहरात विकासाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. आपले शहर स्वच्छ राहावे. यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता कचरा दररोज उचलला जात आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्याच्या दृष्टिने प्रयत्नशील असून नागरिकांनीही कचरा कुंडीबाहेर न फेकता कुंडीतच टाकून सहकार्य करावे. शहर स्वच्छतेत नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.- सुनिल मेंढे, नगराध्यक्ष, भंडारा.