पत्रकार परिषदेतर्फे भैरम सन्मानित

By Admin | Updated: January 9, 2016 00:53 IST2016-01-09T00:53:48+5:302016-01-09T00:53:48+5:30

मराठी पत्रकार परिषद मुंबईकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात बुधवारला पार पडला.

Bhairam honored by the press conference | पत्रकार परिषदेतर्फे भैरम सन्मानित

पत्रकार परिषदेतर्फे भैरम सन्मानित


भंडारा : मराठी पत्रकार परिषद मुंबईकडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार सोहळा ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात बुधवारला पार पडला.
भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाला रंगण्णा वैद्य आदर्श जिल्हा संघ पुरस्कार घोषित झाला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एस.एम. देशमुख, मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त किरण नाईक, सिध्दार्थ शर्मा, प्रशांत पवार, विकास काटे, ठाण्याचे महापौर संजय मोरे, भिवंडीचे महापौर तुषार चौधरी, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जीवनगौरव पुरस्काराने, चेतन भैरम यांना रंगण्णा पुरस्काराने तर ग.त्र्य माडखोलकर पुरस्काराने मोरेश्वर बडगे, वसंत कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhairam honored by the press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.